Ind vs SA 2nd T20 | दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी- 20 साठी रोहित शर्मा ‘या’ खेळाडूंना देऊ शकतो डच्चू
गुवाहाटी : वृत्तसंस्था – भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील दुसरा टी- 20 सामना (Ind vs SA 2nd T20) हा रविवारी गुवाहाटीमध्ये खेळवण्यात येणार आहे. यगोदरच्या सामन्यात टीम इंडियाने आफ्रिकेचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी संघव्यवस्थापन आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हे भारतीय संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. (Ind vs SA 2nd T20)
या सामन्यात लोकेश राहुल (Lokesh Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे सलामीला येतील. तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली (Virat Kohli) खेळण्यास येईल. याशिवाय जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) चौथे स्थान फिक्स आहे. तर यष्टीरक्षणाची जबाबदारी पुन्हा एकदा दिनेश कार्तिकला (Dinesh Kartik) दिली जाऊ शकते. या सामन्यात दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या (Jaspreet Bhumrah) जागी मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) अंतिम संघात स्थान मिळू शकते. तर दीपक चहर (Deepak Chahar) आणि अर्षदीप सिंह (Arshdeep Singh) यांनाही संघात संधी दिली जाऊ शकते. तसेच अक्षर पटेल (Akshar Patel) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांच्याकडे फिरकी माऱ्याची धुरा सोपवली जाऊ शकते. त्यामुळे हर्षल पटेलला संघाबाहेर बसावे लागू शकते.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या,
दिनेश कार्तिक, अर्षदीप सिंह, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन.
Web Title :- ind vs sa 2nd t20 bitter decision for rohit sharma for 2nd t20 vs south africa these players will get dutch this will be the final team Sport news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Women Asia Cup 2022 | आजपासून रंगणार महिला आशिया चषकाचा थरार; इंडिया वि. श्रीलंका होणार पहिली लढत
Eng vs Pak | इंग्लंड-पाकिस्तान सामन्यात बॉल लागल्यामुळे भर मैदानात कळवळला अम्पायर, Video आला समोर