IND Vs SA | टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर क्रीडा मंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  IND Vs SA | दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट ‘ओमिक्रॉन’ चा (Variant Omicron) प्रसार वेगानं झाल्यानं टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा हा संकटात सापडला आहे. टीम इंडिया नियोजित वेळापत्रकानुसार पुढील महिन्यात आफ्रिकेच्या दौऱ्यावर (IND Vs SA) जाणार आहे. या विषयावर ‘क्रिकेट साऊथ आफ्रिका’ (Cricket South Africa) सोबत चर्चा सुरू असल्याचे बीसीसीआयकडून (BCCI) सांगण्यात आले आहे. या विषयावर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत (IND Vs SA) पाठवण्यापूर्वी सरकारचा सल्ला घ्यावा, अशी सूचना अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

 

नियोजित वेळापत्रकानुसार टीम इंडियाची पहिली टेस्ट 17 डिसेंबर रोजी जोहान्सबर्गमध्ये (Johannesburg) सुरू होणार आहे.
या दौऱ्यासंदर्भात ‘कोरोनाचा नवा व्हेरिएंट ज्या देशांमध्ये आढळला आहे.
तिथं टीम पाठवण्यापूर्वी बीसीसीआयच नाही तर प्रत्येक क्रीडा संघटनेनं सरकारचे मत विचारात घ्यायला हवे.
ज्या देशात धोका आहे, तिथं टीम पाठवणे योग्य नाही.’ असे मत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

 

टीम इंडिया ए सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (IND Vs SA) आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतर बीसीसीआय टीमला परत बोलावेल असं अंदाज व्यक्त केला जात होता.
पण ‘इंडिया ए’ ‘टीमचा दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होईल. टीम इंडियाला आफ्रिकेत पाठवण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
अशी माहिती बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरूण धूमल (BCCI Treasurer Arun Dhumal) यांनी दिली आहे.

 

Web Title : IND Vs SA | india tour to south africa union sports minster anurag thakur said bcci should consult government before sending cricket team to south africa

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

अवघ्या 25 हजारात येथे मिळेल स्टायलिश Hero Maestro, सोबत 12 महिन्यांचा वॉरंटी प्लान

Slim and Trim | लग्नाच्या वयात आलेल्या मुलींनी हिवाळ्यात ‘हे’ 4 पदार्थ खाणे बंद करावेत, अन्यथा बिघडू शकते फिगर

Omicron Variant | ‘कोरोना’चा नवा व्हेरिएंट ‘ओमिक्रॉन’चा सर्वाधिक धोका कोणाला? समोर आली महत्त्वाची माहिती