Ind vs SA | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘हा’ खेळाडू होणार टीममधून बाहेर? कशी असणार भारताची प्लेइंग XI

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Ind vs SA | पाकिस्तान (Pakistan) आणि नेदरलँडविरुद्ध (Netherlands) जिंकल्यानंतर टीम इंडिया आज दक्षिण आफ्रिकेसोबत (South Africa) भिडणार आहे. हा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकासाठी खूप महत्वाचा असणार आहे. या सामन्याच्या निकालावर पुढचे गणित ठरणार आहे. हा सामना पाकिस्तानसाठीदेखील महत्वाचा असणार आहे. या सामन्याच्या निकालावर पाकिस्तानचे भवितव्य अवलंबून असणार आहे. भारताचा हा तिसरा सामना पर्थमध्ये (Perth) खेळवण्यात येणार आहे. पण या सामन्यात भारतीय संघात काही बदल होणार का? रोहित शर्मा (Rohit Sharma) सलामीला अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलऐवजी (Lokesh Rahul) दुसऱ्या खेळाडूला संधी देणार का? असे प्रश्न सध्या चाहत्यांना पडले आहेत. (Ind vs SA)

 

राहुलला विश्रांती मिळणार?

लोकेश राहुल हा टीम इंडियाचा भरवशाचा फलंदाज मानला जातो. मात्र त्याला पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध त्याला अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानविरुद्ध राहुल 4 धावा करुन बाद झाला. नेदरलँडविरुद्धही त्यानं मोठी खेळी करण्याची संधी घालवली. राहुलला त्या सामन्यातही दुहेरी धावांचा आकडा गाठता आला नाही. राहुल हा टीमचा उपकर्णधार आहे. शिवाय त्यानं याआधी टीम इंडियासाठी मोठ्या खेळी केलेल्या आहेत. त्यामुळे रोहित शर्मा राहुलवर पुन्हा एकदा विश्वास टाकणार असा अंदाज चाहत्यांकडून वर्तवला जात आहे.

 

 

कुठे आणि कधी पाहता येणार सामना ?

भारत वि. दक्षिण आफ्रिका (Ind vs SA)

सुपर 12, ग्रुप 1 मॅच

ऑप्टस स्टेडियम, पर्थ

संध्याकाळी 4.30 वा.

थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स, डिस्ने हॉट स्टारवर

संभाव्य भारतीय संघ

रोहित शर्मा (कॅप्टन), लोकेश राहुल/रिषभ पंत, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ – तेम्बा बवुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, रायली रुसो, एडन मारक्रम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पार्नेल, कगिसो रबाडा, एनरिच नॉकिया, केशव महाराज, तबरेज शम्सी.

 

Web Title :- Ind vs SA | probable xi of team india against south africa match on sundya

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा