‘बॉलर’ उमेश यादवनं केलं ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच घडलं (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना रांची येथे खेळवण्यात येत असून या सामन्यात भारताने मजबूत पकड मिळवली आहे. या सामन्यातील पहिला डाव भारताने 9 बाद 497 धावांवर घोषित केला आहे. या सामन्यात भारताच्या रोहित शर्मा याने शानदार द्विशतक झळकावत नवीन विक्रम केला आहे. तर अजिंक्य रहाणे याने शतक झळकावत मोलाचे योगदान दिले.

मात्र या सामन्यात सर्वांचे महत्वाचे ठरले ते उमेश यादव याने मारलेले पाच षटकार. त्याने या सामन्यात 9 व्या क्रमांकाला फलंदाजीला येत अवघ्या 10 चेंडूत 31 धावा करत नवीन विक्रम केला. त्याने या सामन्यात आफ्रिकेच्या लिंडे या गोलंदाजाला हे पाच षटकार मारत विक्रम केला. टी -20 क्रिकेटपेक्षाही धमाकेदार खेळी त्याने केली. या पाच शतकारांसह तो एकही चौकार न लगवता पाच षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

याआधी हा विक्रम इंग्लडच्या कीथ बॉयसच्या नावावर होता. त्यानंतर न्यूझीलंडच्या टीम साऊथीच्या नावावर होता. तर कपिल देव यांनी 1986 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 23 धावा केल्या होत्या.तसेच कसोटी सामन्यांमध्ये पहिल्या दोन चेंडूवर षटकार मारण्याच्या विक्रमाशी देखील त्याने बरोबरी केली. याआधी सचिन तेंडुलकर आणि फोफी विलियम्स यांनी हा पराक्रम केला आहे.दरम्यान, 310 च्या स्ट्राइक रेटनं धावा करत यूएमशी यादव याने न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगचा देखील रेकॉर्ड मोडला. त्याने 11 चेंडूंत 31धावा केल्या होत्या.

 

Visit  :Policenama.com

Loading...
You might also like