BADLUCK ! विराट कोहलीकडून ‘हे’ रेकॉर्ड होता-होता राहिलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या वर्ल्डकपच्या सामन्यात भारतीय संघाने ६ विकेट्सनी विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. मात्र या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली एक विक्रम करण्यापासून हुकला. या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतकी खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात विराट कोहली मात्र चाचपडत खेळताना दिसून आला. त्याने ३४ चेंडूत फक्त १८ धावा केल्या.

या सामन्यात विराट कोहलीला सलग तीन शतके ठोकून नवा विक्रम करण्याची मोठी संधी होती, मात्र त्याने ती गमावली. याअगोदर त्याने २०११ आणि २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते. कालच्या सामन्यात देखील त्याने शतक झळकावले असते तर सलग तीन वर्ल्डकपमध्ये पहिल्या सामन्यात शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला असता.

२०११ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध सलामीच्या सामन्यात शानदार नाबाद १०० धावांची खेळी केली होती. त्यानंतर २०१५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या सलामीच्या सामन्यात १०७ धावांची खेळी केली होती. हा विक्रम जरी त्याचा हुकला असला तरी त्याने कर्णधार म्हणून सर्वात कमी सामन्यात ५० विजय मिळवण्याची किमया केली आहे. त्याने हा विक्रम ६९ सामन्यात केला आहे.

सर्वात कमी सामन्यात ५० विजय मिळवणारे कर्णधार

६३ – क्लाइव लॉयड

६३ – रिकी पॉन्टिंग

६८ – हंसी क्रोन्ज

६९- विराट कोहली

७० – विव रिचर्ड्स

दरम्यान, भारतीय संघाचा पुढील सामना हा ९ जून रोजी बलाढ्य ऑस्ट्रेलियाबरोबर होत असून १६ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर होणार आहे.