IND vs SL 3rd ODI | कुलदीप यादव सचिन तेंडुलकरचा ‘तो’ विक्रम मोडण्यापासून दोन पाऊले दूर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील (IND vs SL 3rd ODI) आजचा तिसरा आणि शेवटचा सामना तिरुवनंतपुरम येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताचा चायनामॅन अशी ओळख असलेला कुलदीप यादव हा सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्यापासून काही पाऊले दूर आहे. (IND vs SL 3rd ODI)

 

या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने हि मालिका आधीच खिशात घातली आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना जिंकून श्रीलंकेला क्लीन स्वीप करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. मागच्या सामन्यात कुलदीपला त्याच्या कामगिरीमुळे सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. मागच्या सामन्यात तीन बळी घेत कुलदीप यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो भारताचा 23 वा खेळाडू ठरला आहे. जर त्याने आजच्या सामन्यात दोन विकेट घेतल्यास, तो भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरला मागे टाकेल. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 201 विकेट्स घेतल्या आहेत.

भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
अनिल कुंबळे – 953 विकेट्स
हरभजन सिंग – 707 विकेट्स
कपिल देव – 687 विकेट्स

 

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक),
सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

 

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), अशेन बंदारा,
चरिथ असलंका, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, जेफ्री वेंडरसे, चमिका करुणारत्ने, कसून राजिथा, लाहिरू कुमारा

 

Web Title :- ind vs sl 3rd odi kuldeep yadav likely to break sachin tendulkars record for taking most wickets in international cricket

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘माझी महिलांना विनंती आहे, जास्त पलटण वाढवू नका’, अजित पवारांचा सल्ला अन् एकच हश्शा

Nepal Plane Crash | नेपाळमध्ये यती एअरलाइन्सचे विमान कोसळलं, 32 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

Jalgaon Crime | जळगाव हादरलं! 16 वर्षीय मुलासोबत आरोपीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य