Ind Vs SL New Schedule | लखनऊमध्ये होणार भारत-श्रीलंकेचा पहिला टी-20 सामना, BCCI ने जारी केले नवीन वेळापत्रक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ind Vs SL New Schedule | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंकेविरुद्धच्या देशांतर्गत मालिकेतील वेळापत्रकात बदल केला आहे. श्रीलंकेचा संघ पहिली टी20 मालिका खेळणार असून, त्यामध्ये तीन सामने होणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी एक आंतरराष्ट्रीय सामना देखील उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये खेळवला जाणार आहे, टी-20 मालिकेतील पहिला सामना लखनऊमध्ये होणार आहे. (Ind Vs SL New Schedule)

 

टी20 मालिकेनंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका होईल, जी ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 चा भाग असेल.

 

बीसीसीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, लखनौ आता पहिल्या टी-20 सामन्याचे यजमानपद भूषवेल, तर पुढील दोन सामने धर्मशाला येथे खेळवले जातील. आता पहिला कसोटी सामना 4 ते 8 मार्च दरम्यान मोहालीत, तर दुसरा कसोटी सामना 12 ते 16 मार्च दरम्यान बंगळुरूमध्ये खेळवला जाईल. (Ind Vs SL New Schedule)

 

सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

24 फेब्रुवारी – 1ली टी20, लखनऊ

26 फेब्रुवारी – दुसरी टी20, धर्मशाला

27 फेब्रुवारी – तिसरी टी20, धर्मशाला

4-8 मार्च – पहिली कसोटी, मोहाली

12-16 मार्च – दुसरी कसोटी (डे-नाईट), बेंगळुरू

विराट खेळणार मोहालीत 100वी कसोटी!
आता विराट कोहली मोहालीत 100 वा कसोटी सामना खेळू शकतो. जुन्या वेळापत्रकानुसार, विराट कोहलीला बंगळुरूमध्ये 100 वा कसोटी सामना खेळला असता तर तो त्याच्यासाठी खूप खास ठरला असता. आयपीएलच्या सुरुवातीपासून तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग आहे. आगामी आयपीएल हंगामातही विराट आरसीबीच्या जर्सीमध्ये खेळणार आहे.

 

कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ नव्या कसोटी कर्णधाराच्या शोधात आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. रोहित शर्मा, ऋषभ पंत, केएल राहुलसारखे खेळाडू कसोटी कर्णधारपदासाठी आघाडीवर आहेत.

 

Web Title :- Ind Vs SL New Schedule | bcci announces revised schedule for home series against srilanka

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मोबाईल फोनची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा बंडगार्डन पोलिसांकडून पर्दाफाश, 15 लाखांचे 70 मोबाईल जप्त (व्हिडिओ)

 

Post Office Investment Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणुकीवर दुप्पट होतील पैसे, बुडण्याची सुद्धा भीती नाही; जाणून घ्या सविस्तर

 

DCP Sagar Patil | लहान मुले व महिलांसाठी काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्थानी एकत्रित यावे – पोलीस उपायुक्त सागर पाटील