IND Vs SL | श्रीलंका दौर्‍यावर राहुल द्रविड असणार टीम इंडियाचा कोच, ‘या’ खेळाडूला मिळू शकते नेतृत्वाची जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   इंडियन क्रिकेट टीम पुढील महिन्यात लिमिटिड ओव्हर सिरिज खेळण्यासाठी श्रीलंकेला जाईल. मुख्य कोच रवि शास्त्री इंग्लंड दौर्‍यावर व्यस्त असल्याने श्रीलंकामध्ये राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाच्या कोचची भूमिका पार पाडू शकतो. याशिवाय लिमिटिड ओव्हरसाठी दिग्गज ओपनर शिखर धवन पहिल्यांदा टीमचे नेतृत्व करताना दिसू शकतो.

क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, राहुल द्रविडचे (Rahul Dravid) श्रीलंका दौर्‍यासाठी टीम इंडिया सोबत जाणे ठरले आहे.
याशिवाय नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे काही इतर मेंबर्ससुद्धा श्रीलंका दौर्‍यावर कोचिंग स्टाफचा भाग होतील.
आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार श्रीलंकामध्ये खेळाडूंना सराव करण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी मिळेल.

PM मोदी आणि ओबामांच्या सुद्धा पुढे गेला विराट, ‘या’ ठिकाणी पोहचणारा जगातील पहिला क्रिकेटर

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला खेळाडूंच्या सरावासाठी बेंगळुरूमध्ये कॅम्पचे आयोजन करायचे होते.
पण कोरोना व्हायरसमुळे स्थिती खराब असल्याने बीसीसीआयच्या अडचणी वाढल्या.
याशिवाय सध्याची लॉकडाऊनची स्थिती पाहता खेळाडू बेंगळुरूमध्ये एकत्र येणे शक्य नाही.

शिखर धवन होणार कर्णधार

क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, ज्या खेळाडूंची श्रीलंका दौर्‍यासाठी निवड होईल त्यांना रवाना होण्यापूर्वी इंडियामध्येच क्वारंटाइन राहावे लागेल.
याशिवाय आवश्यकता भासल्यास खेळाडूंना श्रीलंकामध्ये सुद्धा क्वारंटाइन व्हावे लागू शकते.

श्रीलंका सरकारच्या सध्याच्या नियमानुसार भारताच्या ज्या लोकांना व्हॅक्सीनचे दोन डोस दिले गेले आहेत.
त्यांना केवळ एक दिवसच क्वारंटाइन राहावे लागेल.
हा नियम 30 जूनपर्यत लागू आहे.
परंतु जेव्हा इंडियन टीम श्रीलंकेसाठी रवाना होईल तेव्हा वेगळे नियम पहायला मिळू शकतात.

श्रीलंका दौर्‍यासाठी टीम सिलेक्शनबाबत माहिती समोर आलेली नाही.
श्रेयश अय्यर अनफिट झाल्याने श्रीलंका दौर्‍यावर टीमसोबत रवाना होणार नाही.
अशा स्थितीत शिखर धवनला टीमचे कर्णधार पद मिळणे निश्चित मानले जात आहे.

Gold Price Today : सोन्या-चांदीचे दर वधारले, जाणून घ्या आजचे नवे दर

Narendra Modi | BJP चा मोठा निर्णय ! राज्यांतील विधानसभा निवडणुकामध्ये आता पीएम मोदींचा चेहरा वापरण बंद

पुन्हा एकदा राजस्थानमध्ये राजकीय भूकंप ! मागील 2 दिवसांपासून आमदारांच्या विविध बैठका सचिन पायलट यांच्या घरात सुरू

Undo Tweet फीचरसह आले Twitter Blue, परंतु यासाठी तुम्हाला द्यावे लागतील पैसे, जाणून घ्या

Web Title : ind vs sl rahul dravid to coach team india on sri lanka tour dhawan to captain