पहिल्या एकदिवसीय सामन्यात ‘किंग’ कोहली आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेलचा ‘डान्स’ (व्हिडीओ)

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – भारत आणि विंडीज यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना काल पावसामुळे रद्द करण्यात आला. सामन्यातील तेरा षटके खेळ झाल्यानंतर अखेर सामना रद्द करण्याची घोषणा सामनाधिकाऱ्यांनी केली. पावसाच्या लपंडावाच्या खेळात चार वेळा व्यत्यय आणला. मात्र या सामान्यातला एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत सून यामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल डान्स करताना दिसून येत आहेत.

पाऊस थांबल्यानंतर खेळाडू मैदानात येत असताना कर्णधार विराट कोहली डान्स करायला लागला. त्यानंतर त्याच्याबरोबर ख्रिस गेल हादेखील डान्स करायला लागला. इतकेच नव्हे तर भारतीय संघातील केदार जाधव आणि मैदानातील कर्मचारी देखील यामध्ये डान्स करण्यासाठी सामील झाले. त्यामुळे हा व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यात फक्त १३ षटकांचाच खेळ होऊ शकला. यामध्ये विंडीजने १ बाद ५४ धावा केल्या. खेळ थांबला त्यावेळी पुन्हा खेळ सुरु होण्याच्या आशा होत्या, मात्र पावसाने विश्रांती न घेतल्याने अखेर सामना रद्द करण्यात आला. यावेळी सलामीवीर एविन लुईसनं नाबाद ४० धावा केल्या होत्या तर दुसरा सलामीवीर ख्रिस गेल हा फार काही करामत दाखवू शकला नाही. ३१ चेंडूत तो केवळ ४ धावा करून बाद झाला.

दरम्यान, टी-२० मालिकेत भारताने दिलेल्या व्हाईटवॉशमुळे विंडीज या मालिकेत विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असून उरलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसून येईल.

आरोग्यविषयक वृत्त