…तर विराट मोडू शकतो डीव्हिलियर्सच्या विक्रम

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात झंझावाती दीडशतकी खेळी केली. विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरचे तीन विक्रम मोडले. विशेष म्हणजे सगळ्यात कमी डावांमध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठून त्यानं आपली ‘विराट शक्ती’ दाखवून दिली. विराट कोहलीनं २१२ वनडे सामन्यांमध्ये २०५ व्या डावात आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील १० हजार धावा पूर्ण केल्या. विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपत आहे. त्याच्या बॅटीतून निघणारी प्रत्येक धाव विक्रमांचे इमले रचत आहे. पुण्यात होणाऱ्या तिसऱ्या सामन्यातही त्याला आणखी एका विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. पुण्यातील सामन्यात तो दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डीव्हिलियर्सच्या अनोख्या विक्रमाशी बरोबरी करू शकतो.

‘चर्चा नको कृती हवी’ : नाशिक महापालिकेत गदारोळ 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा सामना शनिवारी पुण्यात खेळवण्यात येणार आहे. भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात कोहलीने 140 धावांच्या वैयक्तिक खेळीसह सलामीवीर रोहित शर्मासह 246 धावांची भागीदारी केली होती. तसेच दुसऱ्या सामन्यात 157 धावांची खेळी केली होती. परंतु शाय होपच्या नाबाद शतकामुळे विंडीजने सामना बरोबरीत सोडवला.

मायभूमीत सलग चार वन डे सामन्यात शतक करण्याचा विक्रम विराट नावावर करू शकतो. पुण्यातील सामन्यात विराटने धावांचा पाऊस पाडून शतकी खेळी केल्यास तो डीव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी करू शकतो. या मालिकेपूर्वी विराटने ऑक्टोबर 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 113 धावा केल्या होत्या. डीव्हिलियर्सने 2010 आणि 2011 मध्ये सलग चार शतक झळकावली होती.