IND vs WI | 1000 वा एकदिवसीय सामना खेळणारा पहिला देश बनणार भारत, वेस्टइंडीज विरूद्ध अहमदाबादमध्ये ऐतिहासिक सामना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IND vs WI | टीम इंडिया (Team India) अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरल्यावर आणखी एक ऐतिहासिक कामगिरी (Historic Cricket Match) करेल. भारतीय संघाचा हा 1000 वा एकदिवसीय सामना असेल आणि ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला संघ ठरेल. (IND vs WI)

 

भारताशिवाय ऑस्ट्रेलिया Australia (958) आणि पाकिस्तान Pakistan (936) या दोन संघांनी आतापर्यंत 900 चा टप्पा ओलांडला आहे. भारतीय संघाने आपला पहिला एकदिवसीय सामना 48 वर्षांपूर्वी 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध (England) लीड्स (Leads) येथे खेळला होता. मात्र, त्यावेळी चार गडी राखून पराभव झाला.

 

प्रेक्षक नसणार
मात्र, भारतीय संघाच्या या ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षक उपस्थित असणार नाहीत. गुजरात क्रिकेट असोसिएशन Gujarat Cricket Association (GCA) ने सांगितले की, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 6, 9 आणि 11 फेब्रुवारीला तीन सामने खेळवले जातील. Covid-19 महामारीमुळे तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवली जाईल.

 

हे तिन्ही सामने नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. मात्र, त्यानंतर कोलकाता येथे होणार्‍या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत प्रेक्षक असतील. बंगाल सरकारने 75 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला आहे. (IND vs WI)

रोहितकडे असेल लक्ष
या मालिकेत सर्वांच्या नजरा पूर्णपणे तंदुरुस्त होऊन पुनरागमन करणार्‍या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मावर (Rohit Sharma) असतील. वनडेचे कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच मालिका असेल. हा ऐतिहासिक सामना जिंकूनच नव्हे तर मालिकाही जिंकून त्याला चांगली सुरुवात करायची आहे.

 

दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिका (South Africa) दौर्‍यावर जाऊ शकला नाही. जिथे त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार लोकेश राहुलने (Lokesh Rahul) जबाबदारी स्वीकारली पण संघाला विजय मिळवता आला नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली, संघाने आतापर्यंत 10 एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी आठ जिंकले आहेत आणि फक्त दोन गमावले आहेत.

 

यादरम्यान रोहितने 77.57 च्या सरासरीने 543 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर दुहेरी शतकासह दोन शतके आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 208 आहे, जी त्याने 13 डिसेंबर 2017 रोजी मोहाली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) केली होती.

 

 

सर्वाधिक सामने खेळलेले पाच संघ

टीम                 मॅच        विजय       पराभव          टाय/निर्णय नाही             विजयाची टक्केवारी

भारत                999         518          431                  9/41                                       54.54

ऑस्ट्रेलिया         958        581          334                  9/34                                      63.36

पाकिस्तान         936        490          417                  9/20                                      53.98

श्रीलंका              870        395          432                 5/38                                       47.77

वेस्ट इंडिज        834         406         388                 10/30                                     51.11

 

 

– 161 सर्वाधिक एकदिवसीय सामने श्रीलंकेविरुद्ध खेळले

– 93 सर्वाधिक विजय श्रीलंकेविरुद्धच नोंदवले गेले आहेत

– 80 वेळा ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 73 वेळा पराभूत केले आहे

– 418 धावा ही भारताची पाच विकेटसाठी सर्वोच्च धावसंख्या आहे जी 2011 मध्ये इंदूरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती.

– 54 धावांच्या सर्वात कमी धावसंख्येवर टीम श्रीलंकेविरुद्ध 2000 मध्ये शारजाहमध्ये बाद झाला.

 

 

पहिला विजय :
भारताने पहिला विजय 1975 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दहा गडी राखून नोंदवला होता. हा विश्वचषक सामना होता आणि संघ एस वेंकटराघवनच्या नेतृत्वाखाली खेळत होता. भारतीय संघाने प्रथम दक्षिण आफ्रिकेला 120 धावांत गुंडाळले आणि त्यानंतर 29.5 षटकांत लक्ष्य गाठले आणि दहा विकेट्स राखून विजय मिळवला.

100 वा विजय : 1993 मध्ये अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोंदवला गेला.

200 वा विजय : 2000 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली केनियाविरुद्ध

300 वा विजय : 2007 मध्ये, राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजविरुद्ध नोंदवला गेला.

400 वा विजय : 2012 मध्ये श्रीलंकेविरुद्ध महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदाने मिळवला होता.

500 वा विजय : 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली नोंदवला.

 

मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ दाखल
इंग्लंडला T20 मालिकेत पराभूत करण्याचा आत्मविश्वास असलेला वेस्ट इंडिज क्रिकेट संघ भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी बुधवारी अहमदाबादला पोहोचला.

 

वेस्ट इंडिजचा संघ 6 फेब्रुवारीपासून नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. यानंतर कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट केले आहे की, संघ बार्बाडोसहून दोन दिवसांच्या दौर्‍यानंतर भारतात पोहोचला.

 

आम्ही अहमदाबादला सुखरूप पोहोचलो, असा एक व्हिडिओ वेस्ट इंडिज क्रिकेटनेही पोस्ट केला आहे.
गुजरात क्रिकेट असोसिएशनने म्हटले आहे की, कोरोनामुळे तिन्ही सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जातील.

 

 

Web Title :- IND vs WI | ind vs wi india will become first country in the world to play 1000 odis a historic match against west indies will be held in ahmedabad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

Amravati Crime | ‘कोरोना’ चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याप्रकरणी लॅब टेक्निशियनला 10 वर्षे कारावास

 

National Pension Scheme (NPS) | बजेटमध्ये NPS बाबत झालेल्या घोषणेनंतर सरकारी कर्मचार्‍यांना होणार मोठा फायदा, मिळेल वाढलेले सुरक्षा कवच

Anil Deshmukh-Anil Parab | ‘पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी अनिल देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं?’