Ind vs Zim | मेलबर्नमधील सामन्यात रोहित शर्मा करणार टीममध्ये बदल? ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

मेलबर्न : वृत्तसंस्था – Ind vs Zim | टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर 12 फेरीतला शेवटचा सामना भारत (India) आणि झिम्बाब्वे (Zimbabwe) संघांमध्ये होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना करो या मारो असा असणार आहे. या सामन्यात झिम्बाब्वेच्या तुलनेत टीम इंडियाचं पारडे जड आहे. त्यामुळे टीम इंडिया हा सामना जिंकून आपले सेमी फायनलचे तिकीट कन्फर्म करू शकते. या महत्वाच्या सामन्यासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) टीममध्ये काही बदल करणार का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. (Ind vs Zim)

4 सामन्यात केवळ 2 बदल
टीम इंडियाने आतपर्यंत झालेल्या चार सामन्यात टीममध्ये केवळ दोन वेळाच बदल केले आहेत. पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध रोहितनं एकच टीम खेळवली. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) अक्षर पटेलला (Axar Patel) विश्रांती देऊन दीपक हुडाला (Deepak Hooda) संधी दिली. मात्र टीम इंडियाला तो सामना गमवावा लागला. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) रोहितनं आपलं विनिंग कॉम्बिनेशन पुन्हा तयार केलं आणि हुडाऐवजी अक्षर पटेलला टीममध्ये घेतलं. चार मॅचमध्ये एवढे दोनच बदल भारतीय संघात पाहायला मिळाले.

कार्तिक ऐवजी पंतला संधी?
टीम इंडियाचा फिनिशर दिनेश कार्तिकनं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आपल्या बॅटनं खास प्रभाव पाडलेला नाही. त्यानं तीन इनिंगमध्ये केवळ 14 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या जागी रिषभ पंतला संधी मिळणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. दिनेश कार्तिकची कामगिरी पाहता झिम्बाब्वेविरुद्ध पंतला टीममध्ये जागा मिळण्याची शक्यता जास्त आहे. (Ind vs Zim)

संभाव्य भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार) Rohit Sharma (captain), केएल राहुल (KL Rahul), विराट कोहली(Virat Kohli),
सूर्यकुमार यादव(Suryakumar Yadav), अक्षर पटेल (Akshar Patel), हार्दिक पांड्या (Hardik Pandya),
ऋषभ पंत (Rishabh Pant)/ दिनेश कार्तिक (Dinesh Kartik), रवीचंद्रन अश्विन
(Ravichandran Ashwin), भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar), मोहम्मद शमी
(Mohammad Shami), अर्शदीप सिंह (Arshdeep Singh)

Web Title :-  Ind vs Zim | team india probable xi against zimbabwe in super 12 last match

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | मैत्रिणीचे अपहरण करुन लावली विल्हेवाट, पिंपरी चिंचवडमधील पत्रकाराला अटक

Gulabrao Patil | सुषमा अंधारेंवर टीका करताना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, म्हणाले – ‘ठाकरेंच्या पिक्चरमध्ये अंधारे या…’