मिस्ड कॉल आणि WhatsApp वरून सुद्धा बुक करू शकता गॅस सिलेंडर, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : तुम्ही इण्डेन गॅस (Indane Gas) बुकिंग आता ऑनलाइन सुद्धा करू शकता. एलपीजीच्या भारतीय बाजारात गॅस सिलेंडरचा पुरवठा करणारे अनेक सप्लायर आहेत, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indane Gas) त्यापैकी एक आहे.

इण्डेन गॅस ऑनलाइन बुकिंगसाठी अनेक पद्धती आहेत – इण्डेनचे अधिकृत पोर्टल indane.co.in वर लॉग इन करून, रजिस्टर्ड मोबाइल फोनवरून एसएमएसच्या माध्यमातून इण्डेन गॅस आयव्हीआरएस सर्व्हिस किंवा इण्डेन गॅस अ‍ॅपच्या माध्यमातून. आता आणखी एक माध्यम आले आहे ते म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप Whatsapp द्वारे सुद्धा सिलेंडर बुक करू शकता.
एलपीजी रिफिलसाठी सामान्य बुकिंग नंबर 7718955555 आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन इण्डेन गॅस बुकिंगसाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस येथे जाणून घेवूयात…

व्हॉट्सअ‍ॅपवरून इण्डेन गॅस बुकिंग

ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपवर ‘रिफिल’ लिहून 7588888824 वर पाठवून आपला एलपीजी सिलेंडर बुक करू शकतात.
मात्र, नवीन व्हॉट्सअ‍ॅप बुकिंग सुविधेचा लाभ केवळ रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरूनच घेतला जाऊ शकतो.

यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा :

1. आपल्या फोनमध्ये नंबर 7588888824 सेव्ह करा.
2. आता व्हॉट्सअ‍ॅप उघडा, नंतर मॅसेज पाठवण्यासाठी चॅट उघडा.
3. चॅट बॉक्स उघडल्यानंतर गॅस बुक रण्यासाठी REFILL टाईप करा आणि सेंडवर टॅप करा.
4. गॅस बुकिंगची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला STATUS# आणि ऑर्डर नंबर त्याच नंबरवर पाठवावे लागेल.

हिच प्रोसेस बीपीसीएल आणि एचपीच्या ग्राहकांसाठी सुद्धा आहे. बीपीसीएल ग्राहक 1800224344 वर आणि एचपी ग्राहक 9222201122 वर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवू शकतात.

मिस्ड कॉल देऊन सुद्धा बुक होईल सिलेंडर

आता तुम्ही मिस्ड कॉल देऊन सुद्धा गॅस सिलेंडर बुक करू शकता.
यासाठी इण्डेन एलपीजीचे ग्राहक 8454955555 वर, BPCL चे ग्राहक 7710955555 वर आणि एचपी ग्राहक 9493602222 मिस्ड कॉल देऊ शकतात.

या पद्धतींशिवाय अमेझॉन आणि Paytm द्वारे एलपीजी गॅस सिलेंडर रिफिल केला जाऊ शकतो. अनेकदा या कंपन्यांच्या स्कीम अंतर्गत ग्राहकांना कॅशबॅक सुद्धा ऑफर केले जाते.

हे देखील वाचा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Indane Gas | book lpg gas cylinder through missed call and whatsapp this is the process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update