Coronavirus : इंदापूर शहर आणि तालुक्यात ‘कोरोना’चे नवे 10 पॉझिटिव्ह आढळल्याने चिंताजनक वातावरण

इंदापूर, पोलीसनामा ऑनलाइन – (.सुधाकर बोराटे) –  इंदापूर शहर व तालुक्यात आज एकुण दहा रूग्ण कोरोना पाझीटीव्ह आढळल्याने नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण असुन इंदापूर, भिगवण, आकोले व लासुर्णे या परीसरात हे पाॅझीटीव्ह रूग्ण आढळुन आले असल्याची माहीती तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशावे यांनी पोलीसनामाशी बोलताना दीली.

इंदापूर तालुक्यात पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणात रूग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळुन आल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण असुन इंदापूर तालुका कोरोना हाॅटस्पाॅटच्या दीशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. इंदापूर, भिगवण, आकोले व लासुर्णे या भागातील एकुण ४२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यापैकी दहाजण पाॅझीटीव्ह आले असुन 32 जणांचे रिपोर्ट हे कोरोना निगेटीव्ह आले आहेत.

पाॅझीटीव्हमध्ये महसुल विभागातील लासुर्णे विभागात मंडलअधीकारी यांचाही समावेश असुन पाच महीला व पाच पुरुषांचा पाॅझीटीव्ह मध्ये समावेश आहे. नागरीकांनी घाबरून न जाता घरातुन बाहेर पडू नये व स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ. एकनाथ चंदनशिवे यांनी केले आहे. पाॅझीटीव्ह व निगेटीव्ह रूग्णांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगह येथे ठेवण्यात आले असुन त्यांचेवर वैद्यकीय पथकाच्या माध्यमातुन उपचार सुरू असल्याचे तहसिलदार यांनी सांगीतले.