इंदापूरात 20 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेवुन आत्महत्या

इंदापूर : प्रतिनिधी (सुधाकर बोराटे) –   इंदापूर शहरातील अंबीकानगर येथे एका 20 वर्षीय शालेय विद्यार्थ्याने घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी घडली असुन याबाबतची खबर निखील पोपट भोंग (वय 21) रा. इंदापूर अंबीकानगर, जि.पूणे याने इंदापूर पोलीस ठाण्यात दीली आहे.

गौरव विजय राऊत. (वय 20) रा.इंदापूर अंबीकानगर, जि.पूणे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.गौरव हा इंदापूर येथील कला, वाविज्ञान आणि वाणीज्य महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकत असुन त्याने नुकतीच बारावीची वार्षीक परीक्षा देउन ऊत्तीर्ण झाला होता.तर तो आई वडीलांचा एकुलता एक असल्याने तो घरात सर्वांचाच लाडका होता. गौरवच्या जाण्याने राऊत कुटुंबावर दुख्खा:चा डोंगर कोसळला असुन इंदापूरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

यातील खबर देणार यांनी सांगीतले की आज बुधवार दि.22 रोजी सायंकाळी 5:30 वा.चे.सुमारास त्याचे दाजीचा चुलतभाऊ गौरव विजय राऊत.(वय 20) रा.इंदापूर अंबीकानगर ,जि.पूणे याने घरातील सर्वजण बाहेर गेले असताना त्याचे राहते घरातील पत्र्याच्या अँगलला पांढर्‍या सुताच्या दोरीने अज्ञात कारणावरून गळफास घेवुन आत्महत्या केली. असल्याची माहीती इंदापूर पोलीस ठाण्यात दीली असुन आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही.इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात कारणावरून आत्महत्येची नोंद करण्यात असुन पुढील तपास इंदापूर पोलीस हवालदार लोंढे हे करत आहेत.