इंदापूर : काळेवाडीत 20 वर्षीय विवाहीतेची गळफास घेवुन आत्महत्या

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर तालुक्यातील काळेवाडी नं 1 येथील 20 वर्षीय विवाहीतेने सासुरवाडीत दररोजच्या किरकोळ कारनावरून होणार्‍या जाचाला कंटाळुन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सविता अंबादास वाघमोडे ( वय २० वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असुन याबाबतची फिर्याद मयत विवाहितेच्या आई राणी अंबादास वाघमोडे राहणार वटफळी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी इंदापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत इंदापूर पोलीसांकडुन मीळालेल्या माहीतीनुसार मयत संगीता हिचा दीड वर्षापूर्वी अंबादास रामचंद्र वाघमोडे राहणार काळेवाडी नंबर १. ता इंदापूर जिल्हा पुणे. ह्याच्याशी विवाह झाला होता. दोन महिने मुलीचा व्यवस्थित संसार चालु होता.त्यानंतर मात्र पती सासू-सासरे यांच्याकडून घरातील काम केले तरीही काही काम करत नाही म्हणून किरकोळ कारणावरून शिविगाळ मारहाण व जाच करीत होते. मुलगी संगीताने माहेरी आल्यानंतर फीर्यादी यांना याबाबत सांगीतले होते. परंतु संसार प्रपंचामध्ये अशा घटना घडत असतात म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून आपला संसार करायचा अशी समज दीली होती.

दिनांक २७ नोव्हेंबर २०२० रोजी फीर्यादी यांचा पुतण्या मारुती गंगाराम वाघमोडे याला काळेवाडी नं.१ येथुन अप्पा नारायण वाघमोडे याचा दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फोन आला व त्याने सविता हिने घरातील लोखंडी पाइपला स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेतला आहे. असे सांगितले त्यावरून आम्ही काळेवाडी नंबर 1 येथे सासरी आलो. त्याठिकाणी सविता मृत अवस्थेत दिसून आली. म्हणून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पती अंबादास रामचंद्र वाघमोडे पोशा उर्फ शालन रामचंद्र वाघमोडे सासरे रामचंद्र शेटोबा वाघमोडे सर्व राहणार काळेवाडी नंबर १ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशील लोंढे करित आहेत

You might also like