इंदापूर : हायवा ट्रक-दुचाकीच्या अपघातात चिमुकलीसह महिलेचा मृृत्यु

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   इंदापूर शहरातील बाह्यवळण मार्ग इंदापूर चौक येथुन दुचाकीवरून सर्वीस रोडने अकलुज बायपास बाजुकडे जात असताना पुढे जात असलेला हायवा ट्रक रस्त्यामध्ये अचानक ब्रेक दाबुन थांबला व रिव्हर्सने पाठीमागे येवुन दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन वर्षीय चिमुरडीसह १९ वर्षीय महीलेचा जागीच मृृत्यु झाल्याची घटना घडली असुन याबाबतची फिर्याद सोमनाथ रमेश जाधव.सध्या रा.घोडकेनगर रूई, ता.बारामती,जि.पूणे.व मुळ रा.चांदज, ता.माढा,जि. सोलापूर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दीली आहे.

प्रियंका सोमनाथ जाधव (वय 19 वर्षे ) व ज्ञानेश्वरी किरण जाधव (वय दोन वर्षे) असे अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत.फिर्यादी हे त्यांची पत्नी प्रियंका व भावाची लहाण मुलगी ज्ञानेश्वरी यांचेसह दुचाकी क्र. एम.एच.४५, ए.के. ७२१५ या मोटारसायकलवरून मुळ चांदज या गावी जात असताना इंदापुर बाह्यवळन सर्वीस रोडवर रविवार दिनांक २९ रोजी सायंकाळी ५:३० वा.चे सुमारास फिर्यादी यांचे दुचाकी गाडीचे पुढे हायवा टीपर रस्त्यात अचानक ब्रेक दाबुन उभा राहीला.व हायवा चालकाने अचानक रिव्हर्स घेत पाठीमागे जोराने वेगात आणला.

पाठीमागे येणार्‍या टीपर हायवा चालकास फीर्यादी यांनी जोरजोराने दुचाकीचा हाॅर्न वाजवुन थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु हायवा चालकाने हायवा तसाच पाठीमागे आणल्याने फीर्यादी यांचे दुचाकीला हायवाची ड्रायव्हर साईटने धडक बसुन त्यामध्ये फिर्यादी यांची १९ वर्षीय पत्नी व दोन वर्षीय पुतणी यांचे अंगावरून हायवाचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृृृत्यु झाला आहे.तर हायवा चालक पळुन गेला असुन याबाबतची फिर्याद सोमनाथ रमेश जाधव यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दीली आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

You might also like