इंदापूर : चुलत्याकडून पुतण्यावर कोयत्यानं वार

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – सामाईक रस्त्याच्या कारणावरून फिर्यादीचे वडील व चुलते यांच्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाची बाबत पुतण्याने चुलत्याला वडीलासोबत भांडण का केले असे विचारलेच्या कारणावरून चुलत्याने पुतण्यावर कोयत्याने वार केल्याची घटना (मौजे कळाशी, (सुर्यवंशी बसस्टाॅप, ता. इंदापूर) येथे घडली असुन जखमी पुतण्या अक्षय गणपत डुके (रा.अगोती नं.2.ता.इंदापूर) यांनी याबाबतची फिर्याद इंदापूर पोलीसात दीली आहे.

गुरूवार (दिनांक 28 नोव्हेंबर) रोजी फिर्यादीचे वडील गणपत डुके व आरोपी नवनाथ रामदास डुके (रा. कळाशी रेडकेवस्ती, ता.इंदापूर) यांच्यात शेतामध्ये सामाइक रस्त्यावरून शाब्दिक बाचाबाची, शिविगाळ व दमदाटी झाल्याची घटना घडली होती. याबाबत फिर्यादीचे वडीलांनी फिर्यादीस मोबाइलवरून फोन करून कळविले होते.

फिर्यादी अक्षय डुके हे (दि.28) रोजी दुपारी 04 वाजणेच्या सुमारास इंदापूरहून कळाशी रोडने शेतात जात होते. तर त्याच वेळी फिर्यादीचे चुलते आरोपी नवनाथ डुके हे शेतातून इंदापूरकडे निघाले होते. यावेळी फिर्यादी व आरोपी यांची भेट सुर्यवंशी बसस्टाॅपजवळ रस्त्यावर झाली. त्यावेळी फिर्यादीने आरोपीस तुम्ही माझे वडीलांबरोबर भांडण का केले असे विचारले असता आरोपीने फिर्यादीस शिविगाळ व दमदाटी करत हातातील कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादीने त्याचा डावा हात वर केल्याने कोयत्याचा वार फिर्यादीचे डाव्या हातावर कोपराच्या खाली लागुन फिर्यादीस जखमी केले. याबाबतची फिर्याद अक्षय गणपत डुके याने इंदापूर पोलीसात दीली असुन इंदापूर पोलीस दप्तरी गुन्ह्याची नोंद झाली असुन पुढील तपास सहाय्यक फौजदार जाधव हे करत आहेत.

Visit : Policenama.com