इंदापूरात ‘कोरोना’चा कहर ! पुन्हा 35 पाॅझीटीव्ह

इंदापूर : प्रतिनिधी –   मागील महिण्यातील कांही दिवसांच्या विश्रांतीनंतर इंदापूर तालुक्यात कोरोना महामारी पुन्हा डोके वर काढु लागली आहे. कोरोनाच्या बाबतीत विना मास्क फिरणार्‍यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला लागला असल्याचे रिपोर्टवरून दिसुन येत आहे. गुरूवार दिनांक 3 डिसेंबर रोजी इंदापूर तालुक्यात एकुण 35 जण कोरोना पाॅझीटीव्ह आढळले असुन त्यापैकी 6 रूग्ण हे हाय रिस्कमधील असल्याने नागरिकांची चिंता आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढत असल्याचे दिसुन येत आहे.

राज्यशासनाने हळुहळु लाॅकडाउन कमी करण्यास सुरुवात केली आहे. तर सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी दील्याने राज्यातील हजारो शिक्षक व विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी सुरू असुन यामध्ये राज्यात 500 शे च्या वर शिक्षक हे कोरोना पाॅझीटीव्ह आढळले असल्याने आनेक ठीकाणच्या शाळा सुरु करण्यास विलंब होत आहे.तर इंदापुर तालुक्यातील आनेक शिक्षक पाॅझीटीव्ह आले असुन इंदापूर शहरातील एका नामांकित शाळेतील पाच ते सहा शिक्षक कोरोना पाॅझीटीव्ह आढळल्याने सदर शाळा अद्याप सुरु झालेली नसल्याने शाळेत विद्यार्थी पाठविण्यासाठी पालक व विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण आहे.

इंदापूर तालुक्यात कोरोनाच्या खबरदारीविषयी शासनाने घालुन दीलेले नियमांना नागरिकांतुन हरताळ फासुन नियमांचे उल्लंघन कूले जात आहे.परंतु संबधीत प्रशासन कारवाईचा बडगा उगारण्यास धजावत नसल्याने कोरोना महामारी इंदापूर तालुक्यात पुन्हा डोके वर काढत असल्याचे स्पष्ट होत आहे. इंदापूर तालुक्यात गुरूवार दिनांक 3 डिसेंबर रोजी 2020 रोजी जांब येथील 55 वर्षीय पुरूष, निंबोडी येथील 49 वर्षीय पुरूष, सणसर येथील 55 वर्षीय पुरूष,48 वर्षीय पुरूष, 58 वर्षीय पुरूष,42 वर्षीय पुरूष, 16 वर्षीय मुलगी, 61 वर्षीय जेष्ठ महाला,18 वर्षीय युवकाचा समावेश आहे.

तर मानकरवाडी येथील एक पुरूष, म्हसोबाची वाडी येथील 40 वर्षीय पुरूष, लासुर्णे येथील 16 वर्षीय मुलगा, 18 वर्षीय युवती, बोराटवाडी येथील 32 वर्षीय पुरूष, कुंभारगाव येथील 60 वर्षीय जेष्ठ महिला, मदनवाडी येथील 57 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय पुरूष, 36 वर्षीय महिला, कळस येथील 60 वर्षीय पुरूष, इंदापूर येथील 60 वर्षीय महिला,40 वर्षीय महिला, 41 वर्षीय पुरूष, 53 वर्षीय पुरूष, 56 वर्षीय महिला, भोडणी येथील 75 वर्षीय जेष्ठ नागरिक, गलांडवाडी येथील 50 वर्षीय महिला,शहा येथील 32 वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील 34 वर्षीय महिला, बेलवाडी येथील 26 वर्षीय महिला, कुरवली येथील 42 वर्षीय पुरूष, मानकरवाडी येथील 30 वर्षीय पुरूष, 42 वर्षीय पुरूष, उदमाईवाडी येथील 26 वर्षीय युवती, वालचंदनगर येथील 66 वर्षीय जेष्ठ नागरीकाचा समावेश असल्याची माहीती आरोग्य प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.