Coronavirus : इंदापूर तालुक्यात आतापर्यंत 505 बाधित तर 24 जणांचा मृत्यू

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर तालुक्यात सोमवार दिनांक 24 आगष्ट 2020 रोजी सायंकाळी 9 वाजेपर्यंत मोहळचे विद्यमान आमदार, इंदापुर पंचायत समीतीचे उपसभापती व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षासह एकूण 505 जण कोरोना पाॅझीटीव्ह आढळले असुन त्यापैकी 24 जणांचा मत्यु झाला आहे.तर तालुक्यातील एकुण 1398 जणांनी कोरोना चाचणी केली असुन त्यापैकी 742 जण निगेटीव्ह आले आहेत.तर एकुण 314 जण बरे झाले असुन 167 जण वेगवेवळ्या हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहीती इंदापुर उपजिल्हा रूग्णांलय वैद्यकीय अधिकारी सुत्रांनी दीली आहे.

इंदापूर तालुक्यातील कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नसल्याने इंदापूर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोना महामारीपुढे हतबल ठरत असुन इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या भागात सोमवार दिनांक 24 आॅगष्ट 2020 रोजी सायंकाळी 9 वाजेपर्यंत तीन ठीकाणच्या कोरोना टेस्टमध्ये एकुण 24 जण कोरोना पाॅझीटीव्ह आढळुन आले असुन यामध्ये बारामती येथील खासगी लॅबमध्ये 4, इंदापूर कोविड केअर सेंटर येथे रॅपिड अॅटींजन फास्ट टेस्टमध्ये 15 तर शनिवार दिनांक 22 रोजी इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय कोविड केअर सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या व पूणे येथील प्रयोग शाळेत तपासणी करण्यात आलेल्यापैकी 5 जण पाॅझीटीव्ह आढळुन आल्याने इंदापूर तालुक्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनापुढे प्रशासला देखील हतबल होण्याची पाळी आल्याचे चित्र आहे.

इंदापूर तालुक्यातील एकुण 12 जणांनी बारामती येथील खासगी लॅबमध्ये कोरोना टेस्ट केली असुन त्यामध्ये एकुण 4 पाॅझीटीव्ह आले आहेत.तर 8 जण निगेटीव्ह आले असुन त्यामध्ये इंदापूर शहरातील रामदासगल्ली येथील 75 वर्षीय जेष्ठ नागरिक, पवारवाडी उद्धट येथील 25 वर्षीय महीला, बोरी येथील 43 वर्षीय पुरूषव माळवाडी नं.2 बेंडवस्ती येथील 3 वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे.तर दिनांक 22 आॅगष्ट 2020 रोजी इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय कोविड केअर सेंटरमध्ये एकुण 22 संशयीतांचे स्वॅब नमुणे घेण्यात आले होते. सदर स्वॅब हे पूणे येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यांचेही रिपोर्ट आज सकाळी प्राप्त झाले असुन त्यामध्ये एकुण 5 जण पाॅझीटीव्ह आढळले असुन 17 जण निगेटीव्ह आले आहेत.यामध्ये भिगवण येथील 40 वर्षीय पुरूष,पिंपरी बुद्रुक येथील 65 वर्षीय व पडस्थळ येथील 65 वर्षीय जेष्ठ नागरीकाचा समावेश असुन भवानीनगर येथील 4 वर्षीय चिमुकलाही कोरोना पाॅझीटीव्ह आला आहे.

सोमवारी इंदापूर येथील कोविड केअर सेंटर येथे फास्ट अॅटिंजन रॅपीड टेस्ट तपासणीमध्ये एकुण 58 जणांची तपासणी करण्यात आली असुन त्यामध्ये 15 जण पाॅझीटीव्ह आले आहेत तर 43 जण निगेटीव्ह आले आहेत. त्यामध्ये इंदापूरातील चाळीस फुटी रोड येथील 50 वर्षीय नगरपरिषद कर्मचार्‍यासह त्याची 48 वर्षीय पत्नी व 12 वर्षीय मुलगा, इंदापूर नेताजीनगर 42 वर्षीय महीला, अंबीकानगर येथील 65 वर्षीय व तापी बील्डींग येथील 32 वर्षीय युवकाचा समावेश आहे. इंदापूर तालुक्यातील शेळगावचे रहीवासी व मोहोळ जिल्हा सोलापूर मतदार संघांतील राष्ट्रवादीचे 48 वर्षीय विद्यमान आमदार, त्यांच्या 42 वर्षीय पत्नी, 16 वर्षीय मुलगी व त्यांचे 38 वर्षीय स्वीय सचिव यांचा समावेश आहे. तर घोलपवाडी येथील 45 वर्षीय महीला, लासुर्णे येथील 33 वर्षीय पुरूष, वालचंदनगर येथील 53 वर्षीय पुरूष,कुरवली येथील 51 वर्षीय पुरूष व 50 वर्षीय महीलेचा समावेश आहे.

सध्या इंदापुर तालुक्यातील पाॅझीटीव्ह असलेले व वेगवेगळ्या रूग्णांलयामध्ये उपचार घेत असलेले एकुण 167 रूग्ण असुन ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतीगृृह इंदापूर येथे 91,ग्रामीण रूग्णांलय रूई बारामती 5, भिगवण ट्रामा केअर सेंटर 5, पूणे हाॅस्पिटल 12, विश्वजित हाॅस्पिटल लोणी 1, योगेश्वर हाॅस्पिटल दौंड 1,औंध हाॅस्पिटल पूणे 1, अकलुज खासगु हाॅस्पिटल 19, यशोदीप हाॅस्पिटल 1,बारामती खासगु हाॅस्पिटल 12, निमगाव केतकी डीसीएचसी 13 व होम आयसोलोशन 1 असे 167 जणांवर वेगवेगळ्या ठीकाणी उपचार सुरु असल्याची माहीती उपजिल्हा रूग्णालय इंदापूर प्रशासनाने दीली आहे.