Coronavirus : इंदापूर तालुक्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 43 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सविस्तर

इंदापूर : इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2020 रोजी घेण्यात आलेल्या कोरोना फास्ट रॅपीड अ‍ॅटिंजन टेस्टमध्ये 39 कोरोना पाॅझीटीव्ह रुग्ण आढळुन आले आहेत तर बारामती येथील खासगी लॅबमध्ये 4 रूग्ण पाॅझीटीव्ह आल्याने मंगळवार दिनांक 25 आगष्ट 2020 रोजी दिवसभरात इंदापूर तालुक्यात 43 रूग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळुन आले असुन इंदापूर तालुक्यात पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या ही 548 झाली असल्याची माहीती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी दीली आहे.

इंदापूर तालुक्यात 43 कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण आढळण्याची आजची विक्रमी संख्या आहे.तर तालुक्यातील इंदापूर शहर हे खर्‍या अर्थाने कोरोना हाॅटस्पाॅट बनण्याच्या मार्गावर असुन याला इंदापूर नगरपरिषद मुख्याधीकारी व नगराध्यक्षा अंकिता शहा यांचा एकहाती अनागोंदी व ढीसाळ कारभार कारणीभुत असल्याचे बोलले जात आहे.तर इंदापूर नगरपरिषदेमध्ये विरोधी पक्ष नावापुरताच आहे. 60/40 मुळे शहरातील दयनिय स्थीती विषयी कुणीही ब्र शब्द बोलत नसल्याने शहरातील नागरिकांमध्ये कमालीची संभ्रमावस्था असुन इंदापूर नगरपरिषदेचा कारभार रामभरोसे असल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे.

इंदापूर शहरामध्ये दिवसागणीक कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे.तर इंदापूर नगरपरिषदेत नामधारी नगराध्यक्षांचा रिमोट कंट्रोल स्विकृृत नगरसेवकाच्या हातात असल्याने राजा बोले अन दल हाले असा एकाधीकारशाही कारभार व बीकट परिस्थीती सध्या नगरपरिद कारभाराची आहे.तर इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधीकारी हे इंदापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यापेक्षा स्वतची काळजी जास्त घेण्यात मग्न असुन नागरिकांना भेटण्यास त्यांना कसलाही वेळ मिळत नसल्याची चर्चा आहे.मुख्याधीकारी हे शासकीय वेळेत नगरपरिषद ऑफीसमध्ये न बसता इतरत्र त्यांनी ऑफीस सुरू केले असुन तेथे ठराविक मर्जितील लोकांनाच भेटत असल्याने कामानिमीत्त भेटण्यास येणार्‍या नागरिकांना नुसतेच हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिक त्रस्त होत आहेत.

शहरामध्ये आनेक ठीकाणी कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण आढळुन आले असुन नागरिकांच्या आरोग्याच्या हीताची कसलीही कामे होत नसल्याने शहरात सर्वत्र कोरोना घबराटीचे वातावरण आहे.तर इंदापूर तालुक्यातील कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नसुन इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या भागात मंगवार दिनांक 25 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 9 वाजेपर्यंत दोन ठीकाणच्या कोरोना टेस्टमध्ये एकुण 43 जण कोरोना पाॅझीटीव्ह आढळुन आले असुन यामध्ये बारामती येथील खासगी लॅबमध्ये 4, इंदापूर कोविड केअर सेंटर येथे रॅपिड अ‍ॅटींजन फास्ट टेस्टमध्ये 39 जण पाॅझीटीव्ह आढळुन आल्याने इंदापूर शहर हाॅटस्पाॅटच्या दीशेने वाटचाल असल्याचे दिसुन येत आहे.

इंदापूर तालुक्यातील एकुण 10 जणांनी आज बारामती येथील खासगी लॅबमध्ये कोरोना टेस्ट केली असुन त्यामध्ये एकुण 4 पाॅझीटीव्ह आले आहेत.तर 6 जण निगेटीव्ह आले आहेत. त्यामध्ये इंदापूर शहरातील पाटील बंगला येथील 77 वर्षीय जेष्ठ नागरिक, पवारवाडी येथील 39 वर्षीय पुरूष, बाभुळगाव येथील 32 वर्षीय पुरूष व पळसदेव माळवाडी येथील 55 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.तर मंगळवारी इंदापूर येथील कोविड केअर सेंटर येथे फास्ट अ‍ॅटिंजन रॅपीड टेस्ट तपासणीमध्ये एकुण 118 जणांची तपासणी करण्यात आली असुन त्यामध्ये 39 जण पाॅझीटीव्ह आले आहेत तर 79 निगेटीव्ह आले आहेत. त्यामध्ये इंदापूरातील श्रीराम सोसायटी 40 वर्षीय पुरूष,रामदासगल्ली 65 महीला,33 वर्षीय महीला,45 पुरूष,15 वर्षीय मुलगी,व 12 वर्षीय मुलगा, तर इंदापूरातील 27 वर्षीय दोन युवक व 40 वर्षीय महीलेचा समावेश आहे.

अंथुर्णे येथील 56 वर्षीय, 36 वर्षीय, 20 वर्षीय युवती व 12 वर्षीय चिमुकला यांचा समावेश आहे.वालचंदनगर येथील 22 वर्षीय युवक,50 वर्षीय पुरूष,48 पुरूष व 20 वर्षीय युवकाचा समावेश आहे. माळवाडी नं.2, येथील 48 पुरूष, 40 महीला, 26 युवक, 23 युवती, 42 पुरूष, 36 महिला, व 3 महिण्याच्या बाळाचा समावेश आहे.तर कुरवली 75 वर्षीय जेष्ठ नागरिक 70 वर्षीय जेष्ठ महाला ,39 पुरूष,58 महिला,52 महिला, 43 महीला व 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.रेडणी 73 पुरूष, शेळगाव 40, उद्धट 45 महिला, नरूटवाडी 32 पुरूष, भाटनिमगाव 49 महिला, लोणी देवकर 26 पुरूष व बळपुडी येथील 30 वर्षीय युवकाचा समावेश असुन एकुण 39 जण पाॅझीटीव्ह असुन बारामती येथील खासगी लॅबमधील 4 सह 43 पाॅझीटीव्ह आढळुन आले असल्याची माहीती संबधीत प्रशासनाने दीली आहे.