Coronavirus : इंदापूर तालुक्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 77 नवे पॉझिटिव्ह

इंदापूर पोलीसनामा ऑनलाइन – (सुधाकर बोराटे) इंदापूर तालुक्यामध्ये कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नसल्याने प्रशासनाची डोके दुखी वाढली असुन इंदापूर तालुक्यात मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर सायंकाळी 8 वाजेपर्यंत इंदापूर तालुक्यातील वेगवेगळ्या तपासणीमध्ये एकुण 77 रूग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळुन आले आहेत.तर इंदापुर तालुक्यात आजपर्यंत एकुण 2 हजार 247 रूग्ण पाॅझीटीव्ह आढळले असुन त्यापैकी 81 जणांचा मृत्यु झाला असल्याची माहीती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी दीली आहे.

बारामती येथील खासगी प्रयोग शाळेत 17 संशयीतांची तपासणी करण्यात आली असुन त्यामध्ये 7 पाॅझीटीव्ह आले आहेत.त्यामध्ये काझड येथील 44 वर्षीय पुरूष, कालठण नं.1 येथील 35 वर्षीय महिला, 35 वर्षीय महिला, इंदापूर कसबा येथील 45 वर्षीय महिला, बावडा शिवाजीनगर येथील 52 पुरूष, 50 वर्षीय महिला, इंदापूर दत्तनगर येथील 63 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. तर पूणे येथील प्रयोगशाळेतील तपासणीमध्ये 30 पैकी 6 पाॅझीटीव्ह आले असुन त्यामध्ये निराभीमा कारखाना 35 वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील 44 वर्षीय पुरूष, इंदापूर येथील 38 वर्षीय महिला, वालचंदनगर येथील 32 वर्षीय पुरूष, लासुर्णे येथील 24 वर्षीय महिला, बेलवाडी येथील 30 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

इंदापूर उपजिल्हा रूग्णालय कोविड केअर सेंटर अंतर्गत घेण्यात आलेल्या आटिंजन रॅपिड टेस्ट मध्ये 40 जणांची तपासणी करण्यात आली असुन त्यापैकी 14 पाॅझीटीव्ह आढळले आहेत. त्यामध्ये वालचंदनगर येथील 50 वर्षीय पुरूष, वाटलुज ता.दौंड येथील 30 वर्षीय महिला, 10 वर्षीय चिमुरडा व 8 वर्षीय चिमुरडी, वरकुटे बुद्रुक येथील 32 वर्षीय पुरूष, 34 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महिला, भिगवण येथील 60 वर्षीय महीला, लासुर्णे येथील 22 वर्षीय पुरूष, वालचंदनगर येथील 40 वर्षीय महीला, निमगाव केतकी येथील 21 वर्षीय पुरूष, शेटफळ हवेली येथील 50 वर्षीय पुरूष, लोणी देवकर येथील 55 वर्षीय पुरूष, व 22 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

तर इंदापूर तालुक्यात हाॅटस्पाॅट रॅपिड टेस्ट अंतर्गत सणसर येथे 38 रूग्ण पाॅझीटीव्ह आढळुन आले.तर शेळगाव येथे 06 व निमसाखर येथे 06 रूग्ण पाॅझीटीव्ह आल्याने इंदापूर तालुक्यात आज दिवस अखेर एकुण 77 कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण आढळुन आल्याची माहीती तहसिलदार सोनाली मेटकरी, इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे व वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुहास शेळके यांनी दीली.