Coronavitus : इंदापूर तालुक्यात दिवसभरात 17 कैद्यांसह 46 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

इंदापूर : प्रतिनिधी (सुधाकर बोराटे)  –    इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाअंतर्गत कोविड केअर सेंटरमध्ये दिनांक 26 आगष्ट 2020 रोजी घेण्यात आलेल्या कोरोना फास्ट रॅपीड अ‍ॅटिंजन टेस्टमध्ये आज सायंकाळी 9 वाजेपर्यंत 46 रूग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळले असुन त्यामध्ये इंदापूर सबजेल मधील 17 कैद्यांचाही समावेश आहे.तर आज अखेर एकुण 24 जणांचा मृृृृत्यु झाला असुन 594 जण कोरोना पाॅझीटीव्ह आढळुन आले आहेत. त्यापैकी एकुण 18 कैदी असल्याची माहीती इदापूर उपजिल्हा रूग्णांलय वैद्यकीय सुत्रांनी दीली आहे.

आज पाॅझीटीव्ह आढळुन आलेल्या रूग्णांमध्ये इंदापूर सब जेलमधील 17 कैदी पाॅझीटीव्ह आले आहेत.तर परवा एकाचा रिपोर्ट पाॅझीटीव्ह आला होता.त्यामुळे एकुण 18 कैदी पाॅझीटीव्ह झाले असुन हे कैदी इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर, भिगवण व इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगार असुन त्यांना इंदापूर येथील सब जेलमध्ये ठेवण्याची व्यवस्था संबधीत प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे.तर या कैद्यांना इंदापूर सब जेल मधील एका स्वतंत्र रूममध्ये व्यवस्था करण्यात आली असुन त्यांचेवर वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत उपचार करण्यात येणार असल्याची माहीती इंदापूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश लोकरे यांनी दीली आहे.

बुधवार दिनांक.26 आगष्ट रोजी इंदापूर तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात सायंकाळी 9 वाजेपर्यंत फास्ट अ‍ॅटिंजन रॅपीड टेस्टमध्ये एकुण 46 जण कोरोना पाॅझीटीव्ह आढळुन आले असुन बावडा येथील 41 वर्षीय पुरूष व 25 वर्षीय युवकाचा समावेश आहे.तर कळंब 60 पुरूष, 57 पुरूष,46 महीला व 14 वर्षाच्या लहाण मुलीचा समावेश आहे. तर शिरसटवाडी 34 पुरूष,शेळगाव 32 महीला,पळसदेव 65 पुरूष,निमगाव 42 पुरूष, वरकुटे 39 पुरूष,शिरसोडी 35 पुरूष,माळवाडी 45पुरूष,कळाशी 60 महीला,38 महीला,18 वर्षीय युवक, भवानीनगर 16 मुलगा, बोरी काझड 14 लहाण मुलगा, 30महीला,10 लहाण चिमुरडी,79 पुरूष,72 वर्षीय महिलेचा समावेश आहे. निमसाखर येथील एकाच कुटुंबातील 70 वर्षीय महीला,50 पुरूष, 40 महिला, 36 महिला, व 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.तर इंदापूर शहरातील 26 वर्षीय व 32 वर्षीय युवकाचा समावेश आहे.तर इंदापूर सबजेलमधील 17 जणांचा समावेश असुन नागरिकांनी घाबरुन न जाता नियमांचे पालन करून काळजी घेण्याचे आवाहण तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी केले आहे.