Coronavirus : इंदापूरात ‘कोरोना’चे 4 तर जक्शंन मध्ये 1 पाॅझीटीव्ह

इंदापूर तालुक्यातील कोरोना संक्रमीत रूग्णांच्या संपर्कात आलेल्या 30 संशयीतांचे घशातील द्रवाचे नमुणे तपासणीसाठी वैद्यकिय विभागाकडून इंदापूर कोविड केअर सेंटरमध्ये परवा घेण्यात आले होते. सदरचे स्वॅब नमुणे हे पूणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.सदरचे तपासणी रीपोर्ट नुकतेच प्राप्त झाले असुन इंदापूर तालुक्यात एकुण 5 जण कोरोना पाॅझीटीव्ह सापडल्याची माहीती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी दीली आहे.

दर दिवसागणीक कोरोणाच्या रूग्णांमध्ये होत असलेली वाढ ही इंदापूर तालुक्यातील नागरीकांची धाक-दुक वाढविणारी असुन कोरोनाचे चक्र थांबता थांबत नसल्यामुळे नागरीक सध्या कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहेत.तर आज आलेल्या रीपोर्टमध्ये इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहर 4 व जक्शंन 1 असे एकुण 5 जण पाॅझीटीव्ह आले आहेत.तर तालुक्यातील बरेचसे रूग्ण उपरानंतर कोरानातुन बरे होउन घरीही परतले असले तरी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी नागरीकांनी दक्षता घेणे व शासनाचे नियमांचे काटेकोरपणे पालण करणे प्रत्येक नागरीकाच्या आरोग्याच्या हीताच्या दृृृृष्टीने आवश्यक असुन बेपर्वाइने वागल्यास कोरोना कोणालाही सोडेल अशी परीस्थीती सध्यातरी नसल्याने नागरीकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.

इंदापूर नगरपरिषद कोराना दक्षतेच्या बाबतीत उदासीनच

आज दिवसभरात इंदापूर नगरपरिषद हद्दीत कोरोनाचे दोन रूग्ण पाॅझीटीव्ह आढळुन आलेले आहेत.तसेच तालुक्यात कोरोना संक्रमीत रूग्णांच्या संपर्कात आल्याने संशयीत म्हणून ताब्यात घेवुन त्यांच्या स्वॅबचे नमुणे इंदापूरातच घेण्याची प्रक्रीया सुरूवातीपासुन सुरू असुन, कोविड केअर सेंटरही इंदापूर शहराच्या मध्यवर्ती भागातच आहे.

रूग्ण पाॅझीटीव्ह येण्याची संख्याही दर दिवसाला वाढत असल्याने इंदापूर करांची डोकेदुखी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.तर इंदापूर नगरपरिषद प्रशासन शहरात रोगप्रतिबंधक उपाययोजना करण्यासंबधीच्या कसल्याही उपाययोजना राबवित नसल्याने नागरीकांचे आरोग्य टांगणीला लागले असुन भविष्यात इंदापूर शहरामध्ये कोरोना संक्रमणाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यातुन नगरपरिषद प्रशासनाची उदासीनता स्पष्ट दीसुन येत आहे.