Coronavirus : इंदापूरात 5 तर तालुक्यात एकुण 15 रूग्ण ‘कोरोना’ पाॅझीटीव्ह

इंदापूर : ( सुधाकर बोराटे ) पोलीसनामा ऑनलाईन – इंदापूर तालुक्यात बुधवार दि. 15 जुलै 2020 रोजी इंदापूर, निमगाव केतकी व अकोले येथे मीळुन तालुक्यात एकुण 15 रूग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळले असल्याची माहीती इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी दीली आहे. दि.13 जुलै रोजी इंदापूर शहरामध्ये एकुण 10 रूग्ण पाॅझीटीव्ह सापडले होते. त्यांचे संपर्कात आलेले 32 जण आरोग्यविभागाने संशयीत म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांचे स्वॅबचे नमुने उपजिल्हा रूग्णालय येथे मंगळवारी घेण्यात आले होते. व संबधीताना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृृहामध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते.

सदर संशयीतांचे कोरोना तपासणी टेस्ट रिपोर्ट ऊपजिल्हा रूग्णालयास प्राप्त झाले असुन इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहर 5 पाॅझीटीव्ह, अकोले 9 पाझीटीव्ह व निमगाव केतकी येथील एकजण पाॅझीटीव्ह असे एकुण 15 जण आज कोरोना पाॅझीटीव्ह सापडले आहेत. कोरोना महामारीच्या बाबतीत इंदापूर तालुक्यातील स्थीती दिवसेंदीवस बीघडत चालली असुन नागरीकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने कोरोना रोग फैलावत असल्याचे अनेकांचे मत असुन इंदापूर तालुका पूणे जिल्ह्यात हाॅटस्पाॅटच्या दीशेने वाटचाल करत असल्याचे बोलले जात आहे.

तर नागरीकांनी न घाबरता योग्य ती खबरदारी घेवुन नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी केले आहे.