Coronavirus : ‘कोरोना’चा कहर, भिगवणमध्ये 2 तर इंदापूरमध्ये 17 नवे पॉझिटिव्ह

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील कोरोना संक्रमनाचा कहर थांबता थांबत नसुन आज इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय कोविड केअर सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या रॅपीड फास्ट टेस्ट अंतर्गत इंदापूर तालुक्यात एकुण 19 जण पाॅझीटीव्ह आले असल्याची माहीती इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी दीली आहे.

इंदापूर शहरातील पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या दिवसागणीक वाढतच असुन आज एकुण 25 जणांचे घशातील स्वॅबचे नमुणे इंदापूर कोविड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यामध्ये आज सायंकाळी 5:30 वाजेपर्यंतच्या रॅपीड फास्ट टेस्ट तपासणीमध्ये एकुण 19 जण पाॅझीटीव्ह आढळले असुन त्यामध्ये इंदापूर शहरातील 17 व भिगवणमधील 2 जणांचा समावेश असल्याची माहीती उपजिल्हा रूग्णांलय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like