Coronavirus : इंदापूर तालुक्यात कोरोनाचे 13 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सविस्तर

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील कोरोना संक्रमीत रूग्णांच्या संपर्कात असणार्‍या व परवा स्वॅब घेण्यात आलेल्या 39 संशयीतांपैकी 10 जणांचा रिपोर्ट हा कोरोना पाॅझीटीव्ह आला आहे.तर 29 जण निगेटीव्ह आले असुन निमगाव केतकी येथील 3 जणांची तपासणी खासगी रूग्णांलयात करण्यात आली असता त्यातील 3 जणांचा रिपोर्ट कोरोना पाॅझीटीव्ह आला असुन इंदापुर तालुक्यात एकुण 13 जण कोरोना पाॅझीटीव्ह आल्याची माहीती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी दीली,

दर दिवसागणीक कोरोनाच्या रूग्णांमध्ये होणारी वाढ ही इंदापूर तालुक्यातील नागरीकिंची डोके दुखी वाढवीणारी ठरत असल्याने घरातुन बाहेर पडावे तर कोरोना संसर्गाची भीती आहे.व घरात बसले तर कोरोनाची चिंता सतावत असल्याने नागरीकांना इकडे आड आणी तीकडे वीहीर अशी स्थीती झाली आहे. परवा 39 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट आला असुन त्यापैकी 10 जण पाॅझीटीव्ह आले असुन निमगाव केतकी 1, मसोबाची वाडी 2, भिगवण 4, कळाशी 1, इंदापूर 2 असे 10 जण पाॅझुटीव्ह आले असुन त्या व्यतीरिक्त निमगाव केतकी येथील 3 जणांनी खासगीत कोरोना तपासणी केली होती.त्यांचेही 3 जणांचे रिपोर्ट कोरोना पाॅझीटीव्ह आल्याने तालुक्यात एकुण 13 जण पाॅझीटीव्ह सापडले असल्याचे प्रशासनाकडुन कळविण्यात आले आहे.

कालच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नागरीकांच्या तक्रार व्हीडीओ वरून इंदापूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये आत जाऊन रूग्णांची विचारपुस करुन पाॅझीटीव्ह रूग्णांशी चर्चा केली होती. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी नागरीकांनी दक्षता घेणे व शासनाचे नियमांचे काटेकोरपणे पालण करणे प्रत्येक नागरीकाच्या आरोग्याच्या हीताच्या दृृृृष्टीने आवश्यक असुन नागरीकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत असुन नागरीकांनी दक्षता घेण्याचे आवाहन दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.