इंदापूरात तालुक्यात 4 कोरोना पाॅझीटीव्ह

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर तालुक्यातील 16 संशयीतांचे घशातील द्रवाचे स्वॅबचे नमुणे उपजिल्हा रूग्णांलय इंदापूर येथे घेण्यात आले होते. सदर स्वॅबचे नमुणे पूणे येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सदर तपासणी रीपोर्ट नुकतेच प्राप्त झाले असुन इंदापूर तालुक्यात एकुण 4 जण कोरोना पाॅझीटीव्ह आले असल्याची माहीती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी दीली आहे.

तपासणी करण्यात आलेल्यामध्ये इंदापूर तालुक्यात इंदापूर 1, पळसदेव 1,गजक्शंन 1, आणि बावडा 1 असे एकुण 4 जण पाॅझीटीव्ह आले असुन तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव हा नागरीकांची चिंता वाढविणारी बाब असुन पाॅझीटीव्ह रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने तालुक्यात कोरोनाची दहशत पसरत असल्याचे दीसुन येत आहे. इंदापूर तालुका पूणे जिल्ह्यात डेंजर झोनकडे वाटचाल करत असुन तालुक्यातील नागरीक याबाबतीत आवश्यक ती खबरदारी घेताना दीसुन येत नसल्याने तालुक्यातील कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याचे बोलले जात आहे. पाॅझीटीव्ह रूग्ण सापडलेल्या गावातील लगतचा भाग खबरदारीचा उपाय म्हणून संबधीत प्रशासनाकडून सील करण्याची कार्यवाही सुरू असुन नागरीकांनी नियमांचे पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना महामारीचे जाळे इंदापूर तालुक्यात दिवसेंदिवस पसरत असुन तालुक्यातील कोरोना रूग्णांची वाढतती संख्या ही नागरीकांच्या आरोग्याच्या बाबतीत धोकादायक बाब असुन कोरोनाच्या भीतीमुळे इंदापूर तालुक्यातील नागरीक घरातुन बाहेर पडण्यास घाबरत आहेत. नागरीकांनी न घाबरता योग्य ती खबरदारी घेवुन नियमांचे काटेकोरपणे पालण करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी केले आहे.