Coronavirus : इंदापूर शहरात दुसरा तर तालुक्यातील सातवा रूग्ण पाॅझीटीव्ह

इंदापूर : इंदापूर तालुक्यात लाॅकडाउन नियमांचे काटेकोरपणे पालन होत असताना देखील कोरोना विषाणू इंदापूरकरांचा पाठलाग सोडत नसल्याचा प्रत्यय इंदापूर शहरातील जुनी रयतशाळा परीसरात सापडलेल्या दुसर्‍या पाॅझीटीव्ह रूग्ण महिलेच्या माध्यमातुन समोर आले असुन इंदापूर तालुक्यातील सातवा तर इंदापूर शहरातील दुसरा (महीला) रूग्ण पाॅझीटीव्ह सापडला असल्याची माहीती इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी पोलीसनामाशी बोलताना दीली.

इंदापूर तालुक्यात यापूर्वी ग्रामीण भागामध्ये पाच रूग्ण पाॅझीटीव्ह सापडले होते.त्यापैकी एक मयत झाले असुन चार रूग्ण बरे होउन घरी परतले आहेत.तर इंदापूर शहरात दर्गाह मस्जीद चौक, सावतामाळीनगर भागात शनिवार दिनांक 6 जुन रोजी शहरातील पहीला कोरोना पाझीटीव्ह रूग्ण सापडला होता. सदर कोरोना बाधीत 78 वर्षीय जेष्ठ रूग्णांवर पुणे  येथील रूबी हाॅलमध्ये उपचार सुरू आसुन त्यांचे संपर्कात आलेले 20 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना त्यांचे घरीच होम क्वारंटाइन करण्यात आले होते. तर सावतामाळीनगर व दर्गाहमस्जीद चौक परीसरातील सर्व परीसर नगरपरीषदेच्या वतीने सील करण्यात येवुन योग्य खबरदारी घेण्यात आली होती.

त्यानंतर आज शनिवार दिनांक 13 रोजी सकाळी इंदापूर शहरातील जुनी रयत शाळा परीसरातील एक महीला रूग्ण कोरोना पाॅझीटीव्ह सापडली असुन तीच्या पतीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असल्याने शहरात खळबळ उडाली असुन नागरीकांनी योग्य ती खबरदारी घेवुन अत्यावश्यक कामाशिवाय घरातुन बाहेर न पडण्याचे आवाहन इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी, वरीष्ठ पोलीस निरिक्षक नारायण सारंगकर व डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी इंदापूरातील जनतेला केले आहे. जुनी रयत शाळा परीसर सील करण्याची प्रक्रीया शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.तर पाॅझीटीव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेवुन त्यांना आयसोलोशन कक्षात क्वारंटाइन करण्याची व त्यांची तपासणी करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली असल्याची माहीती डाॅ.एकनाथ चंदनशीवे यांनी दीली.