स्वच्छतेचा डंका वाजवणार्‍या इंदापूर नगरपरिषदेचा रहीवाशांकडुन पंचनामा

इंदापूर : इंदापूर नगरपरिषद हद्दीतील स्थानिक रहिवाशांनी नगरपरिषदेची घरपट्टी, पाणीपट्टी व इतर जाचक कराची रक्कम वेळेवर भरून देखील नररपरिषदेकडून स्थानिक रहिवाशांना कोणत्याही मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्याने इंदापूर शहरातील स्थानिक नागरिक आक्रमक झाले असुन दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत नगरपरिषदेने सुविधा उपलब्ध करून न दिल्यास दि. ३१ ऑगस्ट पासुन इंदापूर नगरपरिषदेसमोर बेमुदत धरणे इंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन शहरातील अंबिकानगर येथील, अंबिका अपार्टमेंट मधील सर्व स्थानीक रहिवाशांनी इंदापूर नगरपरिषद नगराध्यक्षा अंकिता शहा व मुख्याधीकारी डाॅ.प्रदीप ठेंगल यांना दीले असुन त्याच्या प्रती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,पूणे जिल्हाधीकारी, उपविभागीय अधिकारी बारामती यांनाही दील्या असल्याचे म्हटले आहे.

इंदापूर नगरपरिषदेला मागील आठवड्यात स्वच्छतेबाबतचा देशपातळीवरील १४ वा व पश्चिंम विभागात सातवा क्रमांक मीळाला असुन नंबर घोषित झाल्यानंतर कामाचा बाऊ करण्यासाठी इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांनी शासनाच्या तिजोरीतील पैशाने हजारो रूपयांचे फटाके उडवुन आनंद व्यक्त केला होता.परंतु इंदापूर नगरपरिषदेचा स्वच्छतेचा कांगावा क्षणिक आनंदाचा ठरला असुन अबिकानगर अपार्टमेंटमधील ७० च्या आसपास वास्तव्यास असणार्‍या स्थानिक रहिवाशांनी स्वच्छतेबाबत तक्रार करून नगरपरिषदेच्या विकासाचे व स्वच्छतेचे वाभाडे काढल्याने इंदापूर नगरपरिषदेला स्वच्छतेत खरोखर नामांकन मिळाले आहे की वशील्याचे घोडे पुढे दामटले आहे.याबाबत शहरात दबक्या आवाजात चर्चा रंगली असुन स्वच्छ व सुंदर शहराचा जनतेसमोर दिखावा निर्माण करणार्‍या इंदापूर नगरपरिषदेचा पडद्याआडचा खरा चेहरा उघडा पडला असल्याचे स्पष्ट होत आहे.

तक्रारकर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे की अंबीकानगर अपार्टमेंटमध्ये नविन ड्रेनेज पाईप लाईन,रस्ता व स्ट्रीट लाईट या मुलभुत सुविधापासुन या भागातील लोक अनेक वर्षापासुन वंचित आहेत.वारंवार मागणी करून देखील इंदापूर नगपरिषद नगराध्यक्षा ,उपनगराध्यक्ष व मुख्याधीकारी हे सुविधा पुरविण्याबाबत लक्ष देत नसल्याने आम्हाला नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागत आहे.तर दिनांक. १० ऑगस्ट रोजी नगरपरिषदेला निवेदन दीले असुन १५ दिवस उलटुन गेले तरी नगरपरिषदेला जाग येत नसल्याने दिंनांक. ३१ ऑगस्ट पासुन बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.