निमगाव केतकी : जावईबापुंचा जीव जडला मेहुणीवर, पठ्ठ्यानं अल्पवयीन मुलीला पळवलं

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथे मोठी मुलगी, जावयी व १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसह एकत्र कुटुंबात वास्तव्यास असलेल्या (४५ वर्षीय) महिलेच्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला तीच्या जावयानेच पळवुन नेल्याची घटना घडली असुन याबाबतची फिर्याद संबधीत मुलीच्या आइने इंदापूर पोलीस ठाण्यात दीली आहे.

शक्रवार दिनांक २६ जून रोजी सायंकाळी ५ वा. चे सुमारास फिर्यादी व तीची थोरली विवाहीत मुलगी ही घरात स्वयपाक करत असताना मदतीसाठी फिर्यादीने लहाण मुलीला स्वयपाकासाठी आईने बोलावले असता ती आईला म्हणाली की आई मी पाच मीनिटात येते.असे सांगुन घरातुन बाहेर पडली ती लवकर घरी न आल्याने फिर्यादीने घराबाहेर येवुन पाहीले असता ती घराच्या बाहेर कुठेच दिसुन आली नाही. आजुबाजुला तीचा शोध घेतला असता ती मीळून आली नाही.

फिर्यादी महीलेने त्यांचे शेजारी राहणार्‍या इसमाला मुलीबाबत विचारले असता त्याने सांगीतले की फिर्यादीचा जावयी सदर अल्पवयीन मुलीस गाडीवर बसवुन घेउन गेला असल्याचे सांगीतले. त्यावर फिर्यादी यांनी तीच्या जावयाला फोन केला असता त्याचा फोन बंद लागत होता. फिर्यादी व तीच्या विवाहीत मुलीने गावात तसेच नातेवाइकाकडे सर्वत्र शोध घेतला असता मीळुन आली नाही.त्यामुळे सदर महीलेने तीचा जावयी याने फार्यादीच्या अल्पवयीन मुलीस कशाचेतरी आमीष दाखवुन पळवुन नेले असलेबाबतची फिर्याद इंदापूर पोलीसात दीली असुन इंदापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.