इंदापूरात डाळींब व्यापार्‍यांवर टोळक्याचा प्राणघातक हल्ला, दोघे गंभीर जखमी

बाभुळगाव : प्रतिनिधी (इंदापूर) –    तालुक्यातील गलांडवाडी नं.२ गावचे हद्दीत अकलुज रोड इंदापूर येथील शिवलिला फ्रुट मार्केट येथील डाळिंब व्यापारी व त्यांचा साथीदार यांचेवर पाच जणांच्या टोळक्याने कमीशनच्या पैशाच्या वादातुन धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना बुधवार दिनांक २ सप्टेंबर रोजी घडली असुन यामध्ये डाळींब व्यापार्‍यासह त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला असुन याबाबतची फिर्याद जखमी डाळींब व्यापारी विलास हरिबा शेंडे.(वय ५०) रा.वरकुटे खुर्द,ता.इंदापूर जि. पूणे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दीली आहे.

शिवाजी अंकुश हेगडे, सागर अंकुश हेगडे रा. वरकुटे खुर्द,ता.इंदापूर,जि.पूणे, आप्पा व्यवहारे रा.मोहिते वस्ती काटी, ता.इंदापूर जि.पूणे व दोन अनोळखी अशी आरोपींची नावे असुन फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादी यांचे मौजे गलांडवाडी न.२ गावचे हद्दीत शिवलिला फ्रुट मार्केट, अकलुज रोड इंदापूर येथे व्यापारी गाळा नं.30 मध्ये फ्रुट व्यवसायाचे दुकान असुन दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजी वरील आरोपींनी फिर्यादी यांचे दुकानात येवुन कमीशनचे पैशाची मागणी करून मोठ मोठ्याने आरडा ओरड करून गोंधळ घालत असताना दुकानातील अभिजीत अवघडे.रा.आठभाई मळा,इंदापूर, जि.पूणे याने आरोपींना दुकानात गोधळ घालु नका बाहेर गोंधळ घाला असे सांगीतल्याचा राग मनात धरुन आरोपींनी अभिजीत अवघडे याच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला.

अभिजीत अवघडे यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी सागर अंकुश हेगडे याने त्याचे हातातील धारधार हत्याराने अभिजित याचे डोकीत वार केला.तर आप्पा व्यवहारे याने चाकुने मांडीत वार करून गंभींर जखमी केले.यावेळी फिर्यादी विलास शेंडे हे अभिजित यास सोडविण्यास गेले असता यातील आरोपी सागर हेगडे याने त्याच्या हातातील धारदार हत्याराने फिर्यादीचे उजव्या हातावर वार करून जखमी केले.तर शिवाजी हेगडे व त्याचेसोबत असणारे दोन अनोळखी साथीदारांनी फिर्यादीस शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दीली असल्या बाबतची फिर्याद दीली आहे. हल्ला करून आरोपी फरार झाले असुन जखमीवर इंदापूर येथील खासगी रूग्णांलयात उपचार सुरू असुन इंदापूर पोलीस दप्तरी गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश लोकरे हे करत आहेत.