इंदापूर : वरकुटे खुर्दच्या महिला सावकारावर फौजदारी गुन्हा दाखल

इंदापूर – व्याजाने घेतलेल्या 84 हजार रूपये मुद्दलाचे व्याजासह तीनपट 2 लाख 52 हजार रूपये रक्कम देवुनही इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द येथील अवैध महिला सावकाराचे पोट न भरल्याने, महिला सावकाराने कर्जदाराचे घरी जावुन कर्जदार व त्याचे पत्नीला शिविगाळ व दमदाटी व दहशत निर्माण करून कर्जदाराचे मालकीची महिंद्रा पिकप गाडी जबरदस्तीने ओढुन घेवुन जाणार्‍या महिला सावकारावर इंदापूर पोलीसांनी उपोषणाच्या पाचव्या दिवशी गुन्हा दाखल केला असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे.

छबाबाई श्रीरंग कांबळे रा.वरकुटे खुर्द, ता.इंदापूर,जि.पूणे असे गुन्हा दाखल झालेल्या अवैध महिला सावकार आरोपीचे नाव आहे.तर संतोष मारूती शिंदे (वय 39) रा.वरकुटे खुर्द(हरळीचे शेत),ता.इंदापूर जि.पूणे असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, वरकुटे खुर्द येथील अवैध महिला सावकार छबाबाई कांबळे यांचेकडून फिर्यादी यांनी मे 2018 मध्ये महिना 10 टक्के व्याजदराने 84 हजार रूपये घेतले होते.सदर पैशाचे महिना 8 हजार 400 रूपयाप्रमाणे फिर्यादी यांनी सावकाराला व्याजापोटी 2 लाख 52 हजार रूपये दीले होते.लाॅकडाऊन काळात फिर्यादी यांचे गाडीला काम नसल्याने ते घरीच होते.त्यावेळी महिला सावकार हीने फिर्यादीच्या घरी जावुन आणखी व्याजाच्या पैशाची मागणी केली.

फिर्यादीकडे सावकाराला देण्यासाठी पैसे नसल्याने सावकाराने अनोळखी माणुस सोबत आणुन फीर्यादी यांना शिविगाळ व दमदाटी करून 30 नोव्हेंबर 2020 रोजी जबरदस्तीने फीर्यादी यांचे मालकीची महिंद्रा पिकअप न.एम.एच.42, 9274 या नंबरची गाडी जबरदस्तीने ओढुन नेली व तक्रार केल्यास सोडनार नाही अशी धमकी दीली होती.त्यामुळे फीर्यादींनी घाबरून फीर्याद दीली नव्हती.त्यानंतर दिनांक 22 फेब्रुवारी 2021 रोजी फिर्यादी यांनी इंदापूर पोलीस निरिक्षक यांचेकडे खाजगी सावकाराबाबत तक्रार अर्ज दाखल करून न्याय मिळण्याची विनंती केली होती परंतु इंदापूर पोलीसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने नाइलाजास्तव फीर्यादी व त्यांची पत्नी दि.15 मार्च 2021 पासुन इंदापूर पो.स्टे. समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.

फिर्यादी व त्यांची पत्नी उपोषणाला बसल्यानंतर उपोषणाच्या पाचव्या दिवशी इंदापूर पोलीसांनी फीर्यादी यांचे तक्रारीची दखल घेवुन अवैध महिला सावकार छबाबाई कांबळे रा.वरकुटे यांचेवर महाराष्ट्र सावकारी कायदा 2014 कलम 39,41, व 379 नुसार फौजदारी गुन्हा दाखल केला असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.