निरवांगीतील निरा नदीवरील बंधार्‍याची गळती थांबविण्याची मागणी

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन  (सुधाकर बोराटे) – इंदापूर तालुक्यातील मौजे निरवांगी येथिल निरा नदी पात्रातील कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍याला मोठ्या प्रमाणात गळती लागली असल्याने बंधार्‍यातील पाणी वाहून गेल्याने बंधारा अल्पावधीतच कोरडा होण्याची शक्यता आहे. या बंधार्‍यातील पाण्याची गळती थांबावण्यात यावी अशी मागणी निरवांगी परिसरातील शेतकरी करीत असुन संबधित प्रशासनाने तात्काळ लक्ष घालण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

निरवांगी येथील निरा नदीच्या पात्रामध्ये कोल्हापूर पध्दतीचा बंधारा आहे. सध्या या बंधार्‍यामधील काही दरपाला बारीक छीद्र पडल्याने त्याद्वारे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पाण्याची होत असलेली गळती त्वरित थांबवावी अशी मागणी येथील शेतकरी व नागरिक करीत आहेत. सध्या हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. परंतु स्थानिकांकडून पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. तर दरपा मधुन पाणी वाहत असल्याने पाण्याचा साठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. ज्या ठिकाणी पाणी जात आहे त्या दरपाची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी व नागरिक केली आहे.

निरवांगी येथील निरा नदीवरील बंधार्‍यातील पाण्यावरती निरवांगी, निमसाखर, दगडवाडी व माळशिरस तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पिके अवलंबून असतात. पाणी कमी झाल्याने हिवाळ्यातच या परिसरातील नागरीकांना पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. नदीच्या पात्रातील कोल्हापूर पध्दतीच्या बंधारा लगत ज्या पाटबंधारे विभागात बंधारा येत आहे त्या ऑफिसचे नाव व संबंधीत अधिकारी व मोबाईल नंबरचे फलक लावणे गरजेचे आहे असे मत शेतकरी व नागरिक करीत आहेत. बंधारा बाबत काही अडचण असेल तर तर लगेच संबंधितना सांगता येतील, अशी मागणी हि शेतकरी करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/