इंदापूर : राष्ट्रवादीच्या पदाधीकारी निवडीवरून माळी समाजात नाराजीचा सुर

इंदापूर – इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहुन तालुक्याच्या राजकारणात महत्वपूर्ण भुमीका बजावणार्‍या माळीसमाजाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठपातळीवरून नेहमीच दुजावावाने वागणुक मीळत असुन तालुक्यातील पदाधीकारी निवडीच्या वेळी आश्वासनांचे गाजर दाखवुन ऐन वेळेला वशील्याने पदाधीकारी निवडी होत असल्याने इंदापूर तालुक्यातील माळी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सुर दीसुन येत आहे.तर इंदापूर तालुक्यात आगामी काळात होणार्‍या निवडणुकांमध्ये माळी समाजाच्या नाराजीचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता जाणकारांकडुन व्यक्त होत आहे.

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदधीकारी निवडीमध्ये तालुकाध्यक्ष, युवक तालुकाध्यक्ष व इंदापूर शहराध्यक्ष या तीन प्रमुख पदासाठी माळी समाजातील आनेक युवक कार्यकर्ते इच्छुक होते.त्यापैकी काही जणांना तर निवड निश्चित झाल्याचे आश्वासन देण्यात आले.परंतु ऐन वेळेला माळी समाजाला डावलुन दुसर्‍याच कोणाचीतरी वशिल्याने निवड केली जात असल्याने तालुक्यात लोकसंखेने तीन नंबरला असणार्‍या माळी समाजाचा वापर राष्ट्रवादी केवळ मते मीळविण्यासाठीच करत असल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादीत कष्टाच्या घोड्यापेक्षा वशिल्याच्या घोड्याला जास्त किंमत असल्याने इंदापूर तालुक्यातील नाराज माळी समाजाचा युवावर्ग आगामी निवडणुकीत वेगळी चुल मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

पुढील काळात इंदापूर तालुक्यात ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्याचबरोबर जिल्हा बँक, जिल्हापरिषद, पंचायत समीती, नगरपरिषदांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना राष्ट्रवादीकडुन माळी समाजाला दुजाभावाची वागणुक मिळत असल्याने माळीसमाजातील बहुतांश युवा वर्गाकडुन राष्ट्रवादीच्या प्रती नाराजी व्यक्त होताना दिसुन येत आहे. तर लोकसभा विधानसभेला माळी समाज राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभा राहील्याने राष्ट्रवादीला इंदापूर तालुक्यात सत्ता टीकवुन ठेवता आली.अण्यथा विधानसभेचे चित्र वेगळे दिसले असते.असे असताना राष्ट्रवादीकडुन पदाधीकारी निवडीत माळी समाजाला जाणीवपूर्वक डावलले जात असुन माळी समाजाचा वापर राष्ट्रवादी केवळ मते मीळविण्यासाठीच करणार का..? असा सवाल युवा वर्गातुन विचारला जात असुन, पुढील काळात इंदापूर तालुक्यातील राजकारण चांगलेच तापणार असल्याचे दीसुन येत आहे.