इंदापूर : बलात्कारपिडीत अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीस ‘उर्मट’ डाॅक्टरचा नकार

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – ( सुधाकर बोराटे ) – एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमीष दाखवुन तीचे राहते घरातुन फुस लावुन पळवुन नेवुन तीच्यावर वेळोवेळी बलात्कार झाल्याचे पोलीस चौकशीत निष्पन झाल्याने, इंदापूर पोलीसांनी पीडीत मुलीस वैद्यकीय तपासणीसाठी इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपजिल्हा रूग्णालयातील तात्कालीन वैद्यकीय अधिकारी डाॅ.साळुंखे यांनी पोलीसांना अरेरावीची भाषा वापरून पिडीत अल्पवपयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्याने डाॅ. साळुंखे यांचे विरूद्ध इंदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरिक्षक गणेश लोकरे यांनी पूणे येथील वरीष्ठ वैद्यकीय अधीकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल केल्याची माहीती दीली आहे.

याबाबत तक्रारीत म्हटले आहे की, रविवार दि.१४ जून २०२० रोजी तरंगवाडी ता.इंदापूर येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस त्यांचेच गावातील २३ वर्षीय मुलाने लग्नाचे अमिष दाखवुन फुस लावुन पळवुन नेल्याबाबतची तक्रार पिडीत मुलीच्या वडीलांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दीली होती.त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपीस सोमवार दि.२२ रोजी अटक करण्यात आली व पीडीत मुलीची त्याचे ताब्यातुन सुटका केली.त्यानंतर पोलीस चौकशीमध्ये मुलीला लग्नाचे अमीष दाखवुन तीच्यावर वेळोवेळी शारीरीक संभोग केल्याचे निष्पन्न झाल्याने बाल लैंगीक अत्याचार कायद्यान्वये आरोपीवर गुन्हा दाखल करूण्यात आला. व पिडीत अल्पवयीन मुलीस इंदापूर येथील उपजिल्हा रूग्णांलयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते.

रूग्णालयातील तात्कालीन वैद्यकीय अधिकारी डाॅ. साळुंखे यांनी अल्पवयीन बलात्कार पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यास कोरोनाचे कारण सांगुन नकार देत पोलीसांना अरेरावीची भाषा वापरून हुज्जत घातली.पोलीसांनी डाॅक्टरांकडे विनंती केली की सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्याचे पुराव्याचे दृृष्टीने पीडीत मुलीची तपासणी होणे आवश्यक आहे.या अगोदर बरेच जबरीसंभोग वैद्यकीय तपासणी आपलेकडे पुरूष डाॅक्टर यांनीच केली आहे.त्याबाबत आपल्याला काय अडचण आहे असे पोलीसांनी विचारताच डाॅ.साळुंखे यांनी बाकीचे डाॅक्टर शहाणे आहेत, मी तेवढा शहाणा नाही असे म्हणत ती मुलगी तीचे बाॅय फ्रेंडबरोबर कोठे कोठे जाऊन फिरून आली असेल, रूग्णालयात लेडीज गायनायीक नाही. मी तीचे मेडीकल करू शकत नाही तुम्ही काँस्टेबल आहात मी एक मेडीकल ऑफिसर आहे तुम्ही मला शिकवु नका असे अपमानास्पद बोलुन पोलीस कर्मचारी यांचेशीच उर्मटपणे हुज्जत घातली.

मी इथे पिडीतेची तपासणी करू शकत नाही तुम्ही तीस बारामती येथे मेडीकल कामी घेवुन जा असे सांगुन तीस वैद्यकीय अधिकारी स्त्री रुग्णांलय बारामती येथे रेफर केले. वैद्यकीय अधिकारी डाॅ.साळुंखे यांनी बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियम२०१२ चे कलम २७ अन्वये पिडीत मुलीची जबरी संभोगाबाबत वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक असताना कर्तव्य टाळुन एका अल्पवयीन पिडीत मुलीची हेळसांड केल्याचे तक्रारीत म्हटले असुन याबाबतची तक्रार सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश लोकरे यांनी पूणे येथील वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी कार्यालयाकडे केली असुन इंदापूर उपजिल्हा रूग्णालय वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनाही तक्रारीची प्रत पाठविल्याचे सांगीतले.

उपजिल्हा रूग्णांलयाकडून डाॅ.साळुखे यांना कारणे दाखवा नोटीस.
कर्तव्यावर असताना बलात्कार पिडीतेची वैद्यकीय तपासणी करण्यास नकार देवून कर्तव्यात कसुर करणारे इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे तात्कालीन वैद्यकीय अधिकारी डाॅ. साळुंखे यांचे पोलीसांशी गैर वर्तन व अरेरावी याबाबतची तक्रार इंदापूर पोलीसांकडून रूग्णांलयास प्राप्त झालेली आहे.त्या संदर्भात डाॅ. साळुंखे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असुन त्याचे स्षष्टीकरण मागीतले आहे.त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

डाॅ. एकनाथ चंदनशिवे .
इंदापूर उपजिल्हा रूग्णालय वैद्यकीय अधिक्षक.