इंदापूरातील डाॅक्टरांकडून रूग्णांची होणारी पिळवणूक कधी थांबणार ?

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन (सुधाकर बोराटे) – आपण एखाद्या आजाराचे स्पेशालिस्ट नाही आहोत. आपल्याकडे सदर आजाराबाबत अणूभव डीग्री प्रमाणपत्र नाही. आपल्या दवाखाण्यात त्या आजारावर उपचार होऊ शकत नाहीत. तरी ही रूग्णं आपल्या दवाखाण्यात उपचारासाठी आल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी इतर दवाखाण्यात जाऊन योग्य उपचार घेण्याचा सल्ला न देता त्या रूग्णांला आपल्याच दवाखाण्यात दाखल करून घेतले जात आहे.

व त्यांच्या आजारासाठी किंवा आॅपरेशन साठी लागणारा खर्च हा भरभक्कम व मोठी रक्कम येत असल्याचे सांगुन सदर रूग्णांला घाबरविण्याचे व फसवणूकीचे प्रकार इंदापूर शहरातील हाॅस्पिटल, दवाखाण्यामधील डाॅक्टरांच्याकडून वाढले असुन स्वत:ला उच्चशिक्षित व उच्चभ्रु म्हणविणारे पांढरपेशा डाॅक्टरांचा गोरगरिब रूग्णांच्या जिवाशी खेळण्याचा व त्यांची पिळवणूक व फसवणूकीचा धंदा इंदापूर शहरात बिनबोभाट व राजरोसपणे सुरू आहे. दररोज शेकडो रूग्णांची लाखो रूपयांची फसवणूक होत असल्याची चर्चा इंदापूर शहरात जोरात सुरू असल्याने वैद्यकीय व्यवसायीकात मोठी खळबळ उडाली आहे.

इंदापूर शहरात अनेक मोठ मोठी हाॅस्पिटल्स व दवाखाने आहेत. परंतु या दवाखाण्यामध्ये विविध आजारावर उपचार करणारे स्पेशालिस्ट डाॅक्टर्स नसल्याने बाहेरून स्पेशालिष्ट डाॅक्टर्स बोलावुन संबधीत रूग्णांवर उपचार व आॅपरेशन केली जात असल्याचे रूग्णांकडून वारंवार बोलले जात आहे. आपल्या दवाखाण्यात संबधीत आजाराबाबत सुविधा नाही. आपल्याकडे त्या आजाराबाबतची डीग्री नाही. तरिही हे डाॅक्टर महाशय बीनबोभाटपणे बाहेरचे डाॅक्टर बोलावुन रूग्णांचे आॅपरेशन व त्याच्यावर उपचार करण्याचा घाट घालत आहेत.

रूग्णांच्या जिवाशी खेळण्याचा किळसवाणा प्रकार इंदापूरातील डाॅक्टरांकडून होत असल्याचे दिसुन येत आहे. परंतु या प्रकारात रूग्णांचे हाल तर होतातच परंतु त्यांची आर्थिक पिळवणूकही हे डाॅक्टर मोठ्या प्रमाणात करत असल्याचे दिसुन येत आहे. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दररोज शेकडो रूग्णांच्या जिवाशी खेळुन गोरगरिब रूग्णांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या या रक्त पिपासु वैद्यकीय व्यवसायीकांच्या या काळ्या धंद्याला लगाम घालणे गरजेचे आहे.

रूग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळुन गोरगरीबांना कर्जबाजारी करून देशोधडीला लावण्याचे मोठे रॅकेट इंदापूरातील वैद्यकीय व्यवसायीकांमध्ये वावरत आहे. यामुळे गोरगरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. परंतु डाॅक्टर मात्र आपली तुंबडी भरण्यासाठी असे काळे धंदे राजरोसपणे करताना दिसून येत आहेत. अशा डाॅक्टरांच्यावर कायदेशिर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी जनतेतुन एकजुट होउन आवाज उठविणे गरजेचे आहे. वैद्यकीय व्यवसायीकांच्या अशा लुटारू वृृृृत्तीला इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी वेळीच लक्ष देवुन आळा घालणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –