विधानसभा 2019 : इंदापूरत दत्तात्रय भरणेंना पुन्हा तिकीट नको : बाळासाहेब घोलप

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – २०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये दत्तात्रय भरणे यांना आमदार करण्यासाठी सर्वांनी तन, मन, धनाने परिश्रम घेतले व भरणे आमदार झाले. मात्र त्यांच्या पाच वर्षाच्या कारकीर्दीत शेतीला पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतीचे अर्थकारण फसले. छत्रपतीत मी अध्यक्षपदावर काम करत असताना भरणे यांनी वारंवार हस्तक्षेप सुरूच ठेवला. त्यांच्या काळात कारखाना विस्तारीकरन न झाल्याने कारखाना व शेतकर्‍यांचे नुकसान झाले. त्यामुळे आमदार भरणे यांना पुन्हा तीकीट नको अशी स्पष्ट भुमिका छत्रपती सहकारी साखर कारखाण्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप यांनी सराटी येथिल राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मांडली. यावेळेस अप्पासाहेब जगदाळे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी व २०२४ ला मला उमेदवारी द्यावी असे मत व्यक्त करून भरणे यांच्या उमेदवारीला उघड उघड विरोध केल्याने दत्तात्रय भरणे यांचे पुढील अडचणी वाढल्या आहेत.

२०१९ च्या इंदापूर विधानसभेचे उमेदवारी तीकीट दत्तात्रय भरणे यांना डावलून इंदापूरात अबकी बार अप्पासाहेब जगदाळे यांना राष्ट्रवादीकडून संधी देण्यात यावी असा सुर सराटी ता. इंदापूर येथिल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यात तालुका नेते व कार्यकर्त्यांनी एकमुखाने आवळल्याने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

इदापूर तालुक्यातील मौजे सराटी येथिल जिजामाता विद्यालयाच्या प्रांगणात बुधवार दिनांक १८ रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंदापूर तालुका कार्यध्यक्ष अमोल भिसे यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंदापूर कृृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, छत्रपतीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप, जेष्ठ नेते अशोक घोगरे,पंचायत समिती सदस्य प्रदिपमामा जगदाळे, भाऊसाहेब सपकळ, प्रभाकर खाडे, राजाभाऊ कुरळे, जावळे बापू इत्यादी प्रमुख उपस्थित होते. या मेळाव्यात इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनाच विधानसभेचे तीकीट देण्यात यावे. अशी कार्यकर्त्यांकडून आग्रही मागणी करण्यात आली.

इंदापूर विधानसभेसाठी ७ जण इच्छुक असुन त्या पैकी कोणाही एकाला विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी आम्ही त्याचे काम एकनिष्ठेने करू परंतु विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांचेकडून निष्ठावान कार्यकर्त्यांना नेहमीच डावलले जात असुन निष्ठावान कार्यकर्ते संपविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नेतेमंडळींनी केला असल्याने दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी गैत्यात असल्याची सध्याची परिस्थिती आहे.

यावेळी अप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, पक्षात एक नेता एक पद हवे. पाच वर्षाचा त्याचा कार्यकाळ असावा. या वर्षी सातजण इच्छुक असुन त्यापैकी कोणालाही तिकीट द्या. मी त्यांना निवडून नाही आणले तर जगदाळे यांची औलाद नाही. परंतु तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असुन तालुक्यातील जनतेची नस ओळखनारा व जनतेस सन्मान देनारा आमदार हवा. गेल्या पाच वर्षात निराभिमा आनेकदा कोरडी पडली, निरा नदीवरील बंधारे खराब झाले आहेत, त्यांना स्वंयचलीत दरवाजे बसविणे गरजेचे आहे, शेटफळ हवेली तलावात पाणी नाही, उजणीतील पाणी तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या शेतातील उभि पिके जळून गेली असा आमदार लोकप्रतिनिधी काय कामाचा असे मत जगदाळे यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले की, मागील दोन दीवसापासुन माझा फोटो कमळाच्या फोटोसोबत खोडसाळपणे व्हायरल केला जात असुन मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. मी शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमाणिक कार्यकर्ता आहे. माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निष्ठा आहे. माझा पवार परिवारावरती प्रमाणिकपणे विश्वास आहे. पाच वर्षात ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत मी पक्षाच्या आदेशानुसार काम केले असुन माझ्या मते तालुक्याचा कारभारी बदलणे गरजेचे आहे. असे अप्पासाहेब जगदाळे म्हणाले.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like