इंदापूर जेतवन बुद्धविहार येथे महामानवास अभिवादन; हर्षवर्धन पाटील यांच्यासह मान्यवरांची हजेरी

इंदापूर – इंदापूर शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकरनगर येथील जेतवन बुद्धविहार येथे विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब उर्फ भिमराव रामजी आंबेडकर यांची १३० वी जयंती सोशल डीस्टन्स व कोविड १९ चे नियमांचे पालन करून साधेपनाने साजरी करण्यात आली.यावेळी इंदापूर सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर धनवे यांचे हस्ते जेतवन बुद्धविहारातील निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्प हार अर्पन करून महामानवास अभिवादन करण्यात आले.त्यानंतर जेतवन बुद्ध विहारातील तथागत गौतम बुद्ध यांचे मुर्तीला पुष्पहार अर्पन करून पंचशिल घेण्यात आले.

तर राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर नगरपरिषद मैदानातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले.तसेच आंबेडकरनगर येथील जेतवन बुद्धविहार येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. व बुद्धविहारातील तथागत गौतम बुद्धांचे मुर्तीस पुष्पहार अर्पन करून दर्शन घेतले.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समीतीच्या वतीने सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर धनवे, हर्षवर्धन पाटील, प्रभारी तहसिलदार अनिल ठोंबरे, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, गटनेता कैलास कदम, यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नरगरसेवीका राजश्री मखरे, रपीआय पूणे जिल्हा संघटक,सचिव शिवाजीराव मखरे, इंदापूर तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, बारामती लोकसभाध्यक्ष बाळासाहेब सरवदे, आशोक मखरे(सर), सुहास मोरे(सर), भाजप शहराध्यक्ष शकिल सय्यद, बहुजन मुक्ती पार्टीचे संजय शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे हणुमंत कांबळे, समता सैनिक दल पुणे जिल्हाध्यक्ष अशोक पोळ, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, आरपीआय मातंग आघाडी पश्चिंम महाराष्ट्र सरचिटनिस नितिन आरडे, आरपीआय इंदापूर शहराध्यक्ष आमोल मिसाळ, उपाध्यक्ष महेश सरवदे इत्यादी प्रमुख उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे स्वागत जयंती उत्सव समीतीचे अध्यक्ष सुहास बापु मोरे,उपाध्यक्ष दर्याराज मखरे, प्रतिक भोसले, अक्षय मखरे,पवन मखरे,प्रशांत मखरे, उत्तम गायकवाड,सिद्धार्थ गाडे, संभाजी मखरे यांनी केले.