इंदापूरजवळ भरधाव कारच्या धडकेत पुण्यातील पती-पत्नीचा मृत्यू

इंदापूर :  पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे )  –  पुणे येथुन पती-पत्नी दोघे मोटार सायकलवर राहत्या गावाकडे जात असताना गागरगाव (लोंढेवस्ती) ता. इंदापूर येथे रस्त्याच्या कडेला पाणी पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी पुणे बाजुकडून भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना जोराची धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृृृत्यु तर जखमी पतीचा रूग्णांलयात नेत असताना मृृृृत्यु झाल्याची घटना रवीवार दि.१७ मे रोजी सकाळी ११:३०वा.सुमारास घडली असुन मयत इसमाच्या पुतण्याने कार चालका विरोधात इंदापूर पोलीसात फिर्याद दीली आहे.

दयानंद कुंडलीक दुपारगुडे व सुवर्णा दयानंद दुपारगुडे सध्या रा.सिंहगड रोड, धायरी गारमळा व मुळ रा.निलेगाव ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद असे मयत पती-पत्नीचे नाव असुन वैभव शुक्रचार्य दुपारगुडे रा.सिंहगड रोड, धायरी गारमळा याने इंदापूर पोलीसात अपघाबाबत फिर्याद दीली आहे.

पुणे सिंहगड रोड येथुन फिर्यादी व अपघातातील मयत पती-पत्नी हे रवीवारी सकाळी ७ वाजता त्यांचे मुळ गाव निलेगाव,ता.तुळजापूर येथे जाण्यासाठी पुणे सोलापूर हायवे रोडने मोटारसायकलवरून सोलापूरच्या दीशेने जात होते. सकाळी ११:३० वा.चे.सुमारास इंदापूर तालुक्यातील गागरगाव (लोंढेवस्ती) येथे रस्त्याच्या बाजूला, साइडपट्टीच्या खाली उतरून पाणी पिण्यासाठी थांबले असताना पुणे बाजुकडून भरधाव वेगाने सोलापूरच्या दीशेने जाणार्‍या हुंन्दाई एक्सेन्ट नं.एम.एच.०४, एच.एम.१५२८ कारने फिर्यादी वैभव याचे गाडीला कट मारून त्याचे समोर उभे असलेले त्यांचे चुलते व चुलती यांना जोराची धडक देवुन उडवीले.

अपघात इतका जबर होता की कारने धडक दील्यानंतर वैभव याचे चुलते व चुलती हे कारचे बोनटवर उडुन जमीनीवर जोरात खाली पडले.यादरम्यान कार चालकाला गाडी आवरता न आल्याने कारने त्या दोघांना कारखाली फरफटत नेले.यावेळी फिर्यादीचे चुलते व चुलती यांना जबर मार लागल्याने चुलती सुवर्णा दुपारगुडे हीचा जागेवरच मृृत्यु झाला.तर चुलते दयानंद दुपारगुडे यांना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय इंदापूर येथे नेले असता डाॅक्टरांनी ते मृृत झाल्याचे घोषीत केले.याबाबतची फिर्याद वैभव दुपारगुडे याने इंदापूर पोलीसात दीली असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.