इंदापूरात जिजाऊंना मान्यवरांकडून अभिवादन

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर शहरातील नेताजीनगर मित्रमंडळाच्या वतीने चाळीस फुटी रोड, महादेव मंदीर या ठीकाणी राजमाता जिजाऊ यांची ४२२ जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून जिजाऊंना अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रा. कृृष्णाजी ताटे, सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अमोल खराडे, माऊली नाचन, हमीद भाई अत्तार, जेष्ठ नागरिक संघाचे घाडगे सर, रफिक बागवान, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर निमगाव केतकी येथे सत्यशोधक ग्रंथालय व जनजागृृृृती संघ इंदापूर तालुका यांचे वतीने जिजाऊ जयंती साजरी करून जिजाऊंना मान्यवरांनी अभिवादन केल्याची माहीती सत्यशोधक ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब भोंग यांनी दीली.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/