इंदापूर : पत्रकारांच्या लेखनीमुळे सर्वसामाण्याला न्याय – मोहोळचे आमदार यशवंत माने

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पत्रकारांच्या धारदार लेखणीमुळे समाजातील सवसामाण्य व पिडीत घटकाला न्याय मीळत असतो.परंतु पत्रकारांच्या व्यथा समजुन घ्यायला कोणाकडेही वेळ नसतो. पत्रकार देखील माणुसच आहे.त्यालाही भावना आहेत, आपल्यासारखेच पत्रकाराचेही कुटुंब आहे, त्यामुळे समाजानेही पत्रकारांना सहकार्याची भुमीका ठेवण्याचे आवाहन मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी जंक्शन येथे मराठी पत्रकार परिषदेच्या 82 व्या वर्धापन दीनानिमीत्त आयोजित सर्वरोग निदान शिबीर उदघाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परीषदेचे विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार इंदापूर तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापन दिनानिमीत्त जंक्शन (ता. इंदापूर ) येथील निलकंठेश्‍वर हॉस्पिटल येथे तालुक्यातील सर्व पत्रकार व त्यांचे कुटुंबीयांसाठी मोफत सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन गुरुवार दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले होते.या शिबीराचे उदघाटन मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत माने यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पूणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रविण माने, वालचंदनगर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, जेष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर, डाॅ. विकास शहा हे प्रमुख उपस्थित होते.

इंदापूर तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जंक्शन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निलकंठेश्‍वर हॉस्पिटमधील तज्ज्ञ डॉ. सचिन घोरपडे, डॉ.अतुल बोरोडे, डॉ.योगेश पाटील, डॉ. केशव जायभाय, डॉ. रणजित कदम, डॉ. गणेश पानसरे यांनी इंदापूर तालुक्यातील ३० पेक्षा जास्त पत्रकार व त्यांचे कुटुंबीयांची मोफत तपासणी केली. कार्यक्रमास पत्रकार रियाज सय्यद, तुषार घाडगे, दादासाहेब थोरात, नितीन चितळकर, सुरेश पिसाळ, मनोहर चांदणे, जावेद मुलाणी, लक्ष्मण सांगवे, रामदास पवार, हरीदास वाघमोडे, संतोष ननवरे, बाळासाहेब रणवरे,प्रेमकुमार धर्माधिकारी, पोपटराव मुळीक, प्रदीप तरंगे, शहाजीराजे भोसले, प्रसाद तेरखेडकर, सुधाकर बोराटे, बाळासाहेब सुतार, रविंद्र देवकाते, आदित्य बोराटे, डॉ. गजानन टिंगरे, रोहित वाघमोडे, सतिश सांगळे, धनंजय थोरात, राजकुमार थोरात इत्यादी प्रमुख पत्रकार यांचेसह तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पत्रकार उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक धनंजय थोरात यांनी केले तर आभार दादासाहेब थोरात यांनी मानले.