इंदापूर : कर्मयोगीचे दक्षता पथक शेतकर्‍यांच्या बांधावर

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महात्माफुलेनगर बीजवडी (ता.इंदापूर) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन 2020-21 साठीचा गाळप हंगाम चालु झाला असुन कारखान्याकडे ऊस तोडणी होवून येणा-या ऊसाची तोडणी व्यवस्थीत व्हावी व अतिवष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची पाहणी करण्यासाठी कर्मयोगी कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, मुख्य शेतकी अधिकारी एस.जी. कदम व सिव्हील इंजिनिअर एस.बी. शिंदे यांचे त्रीसदस्सीय पथकाने सरडेवाडी येथील बागायतदार वामनराव सरडे यांचे शेतातील बांधावर जाउन ऊस तोडणीची व रस्त्यांची पाहणी केली.

यावेळी बाजीराव सुतार यांनी शेतकर्‍याच्या ऊस वजनाचे नुकसान होवू नये व कारखान्याची रिकव्हरी वाढावी यासाठी ऊसतोडणी मजुरांना ऊस तोड ही जमीनीलगत करावी, स्वच्छ व पाचटविरहित ऊस गळीतास आणावा, वाहन चालकाने फडातून तोडणी केलेला ऊस घेवून येताना रस्सीने घट बांधलेला आहे का याची पाहणी करावी. ट्रेलरला मागील बाजूस कापडी रिफलेक्टरचा वापर करावा व विनाअपघात वाहन कारखाना साईटवरती हजर होईल याची दक्षता घेण्याबाबतच्या सुचना दील्या.

ऊसाबरोबर कोणतेही फॉरेन मटेरियल येणार नाही याची दक्षता घ्यावी, कोरोना संदर्भात ऊसतोड मजूर, वाहतुक यंत्रणा या सर्वांनी काळजी घ्यावी अशा सुचना केल्या. या भागातील इतर आनेक शेतकरी सभासदांच्या बांधावर जावुन कर्मयोगीच्या त्रीसदस्यीय पथकाने पाहणी करून ऊस कामगारांनी योग्य काळ घेण्याबाबतच्या सुचना दील्या.यावेळी मौजे सरडेवाडी येथील शेतकरी सभासद वामनराव सरडे व हिंगणगांव येथील ऊस उत्पादक यांनी कर्मयोगीच्या त्रीसदस्सीय पथकाचे स्वागत करून आभार व्यक्त केले.