महाराष्ट्राच्या ‘संस्कृृती’चा वारसा पुढे नेण्याचे काम युवतींच्या हाती : ZP सदस्य अंकिता पाटील

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर तालुक्यातील सर्व युवतींना सोबत घेवुन पुढील काळात प्रत्येक वर्षी संक्रातीचा तीळगुळ कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविणार असुन सर्व क्षेत्रात कार्य करणार्‍या महीलांनांही यामध्ये सहभागी करून घेणार आहे. मी जिजाऊ बोलतेय हा एक पात्री प्रयोग सादर करून संपूर्ण महाराष्ट्रात जिजाऊंच्या कार्याची ओळख करून देणार्‍या गौरी तावरे-थोरात कन्येच्या सन्मानासाठी आज हर्षवर्धन पाटील स्व:त हजर राहीले असुन महाराष्ट्राच्या संस्कृृृृतीचा वारसा पुढे नेण्याचे काम आता युवतींच्या हातामध्ये असल्याचे मत पुणे जिल्हा परिषद सदस्या व इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या सदस्या अंकीता पाटील यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.

इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशन, इंदापूर पंचायत समिती व इंदापूर नगरपरिषद आयोजित मकरसंक्राती हळदीकुंकु, तीळगुळ व वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर येथील शहा सांस्कृृृृतीक भवन येथे आयोजन करण्यात आले होते. यानीमित्ताने महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी पुरस्कार विजेत्या गौरी तावरे-थोरात यांनी मी जिजाऊ बोलतेय या विषयावरील एक पात्री प्रयोग सादर करून उपस्थित महिला वर्गाची वाहवा मिळवीली.

यावेळी राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते गौरी तावरे – थोरात यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार समारंभ कार्यक्रमात अकिंता पाटील या अध्यक्ष पदावरून बोलत होत्या. यावेळी पंचायत समितीच्या सभापती पुष्पा रेडके, उपसभापती देहाडे, इंदापूर नगरपरिषद नगराध्यक्षा अंकीता शहा, रूतुजाताई पाटील, विजयाश्री तावरे, मायाताई विंचु, भाजप इंदापूर तालुकाध्यक्ष नाना शेंडे, अॅड.कृृष्णाजी यादव, महेंद्र रेडके इत्यादी प्रमुख माण्यवर उपस्थित होते.

जिजाऊ फेडरेशनच्या माध्यमातुन सलग 11 वर्षापासुन हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजन करण्यात येत असुन या माध्यमातुन आपण सर्वांनी एकत्र येवुन महिला सबलीकरणाचे कार्यक्रम राबविणार असल्याचे त्या म्हणाल्या. याप्रसंगु हर्षवर्धन पाटील म्हणाले की, हा महीलांचा तीळगुळाचा कार्यक्रम आहे. परंतु जिजाऊंची भुमिका साकार करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 150 प्रयोग गौरीने सादर केले असुन इंदापूरात गौरी हीचा मी जिजाऊ बोलतेय हा कार्यक्रम यापूर्वी झालेला नाही. 151 वा प्रयोग ती आज इंदापूरमध्ये सादर करत असल्याने तीच्या सत्कारासाठी मला यावे लागले. भविष्यात अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजनासाठी तालुक्यातील युवती व महिलांनी पुढे यावे. त्यांना लागणारी सर्वप्रकारची मदत आमच्याकडून केली जाइल असे आश्वासन हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थितांना दीले. यावेळी प्रास्ताविक रूतुजाताई पाटील यांनी केले तर सुत्रसंचलन रघुनाथ पन्हाळकर, सुधा गायकवाड यांनी केले.

फेसबुक पेज लाईक करा –