पोलीसनामा ऑनलाईन टीम : ( सुधाकर बोराटे ) इंदापूर दूधगंगा सहकारी संघाने मार्च 2020 पासुन पुढील पाच वर्षासाठी अमुल दुध संघाशी दुध संकलन करार (सोयरीक) केला असुन पुढील पाच वर्षे इंदापूर तालूक्यात उत्पादीत होणारे दुध हे दुधगंगा सहकारी संघ व अमुल दुध संघाच्या माध्यमातुन शासन हमी भावापेक्षा जास्त दराने खरेदी करण्यात येत असुन दिनांक 8 मार्च 2020 रोजीपासुन दुध संकलन प्रकल्प सुरू करण्यात आला असल्याची माहीती राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर दुधगंगा सहकारी संघाच्या कार्यालयात आयोजीत पत्रकार परीषदेत बोलताना दिली.यावेळी दुधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील,कार्यकारी संचालक एम.डी. कुलकर्णी, विलासबापु वाघमोडे उपस्थीत होते.
अमल दूध संघ हा राज्यातील नामांकीत संघ असल्याने या दुध संघाला दुधाची क्वालीटी लागते.कमी फॅट व दुधात भेसळ अजीबात चालत नाही.तसेच शासनाच्या हमी भाव 25 रूपयापेक्षा जास्त दर अमुल देत असुन महिण्यातुन तीनदा म्हणजेच दर दहा दिवसाला दुधाचे पेमेंट अदा करण्यात येते असल्याने शेतकर्यांना याचा चांगला फायदा होणार आहे. तर अमुलचे पशुखाद्य हे उच्चप्रतीचे व चांगल्या दर्जाचे असल्याने जणावरांचे दुधात चांगली वाढ होत असल्याने जास्तीत जास्त शेतकर्यांचा जणावरांना अमुलचेच पशु खाद्य देण्याकडे कल असतो. तर फॅट जस जसी वाढेल तस तसा दूधाला चांगला म्हणजेज जवळ जवळ 40 ते 45 रू.प्रति लिटरपर्यंत दुधाला भाव मिळत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगीतले.
इंदापूर तालुक्यात दररोज सरासरी सहा ते सात लाख लिटर दुध उत्पादन होत असुन शेतकर्यांच्या दूधाला 25 रू.प्रतिलिटर हमी भावापेक्षाही पाच ते सहा रूपये कमी दर मिळत असल्याने तालुक्यातील दुध उत्पादकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. तर इंदापूर दुधगंगा सहकारी दुध संघाची दुधसंकलन क्षमता सध्या एक लाख लिटरची असुन यामध्ये सकाळी एक लाख लिटर व संध्याकाळी एक लाख लिटर दूध संकलीत क्षमता आहे.तर सध्या तीन हजार लिटर पेक्षा जास्त दुध संकलन होत असुन पुढील काळात दुध संकलन क्षमता ही दुपटीने वाढविण्यात येणार आहे. तर दुधाला हमी भावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकरी दुधगंगाला दुध देण्यासाठी आकर्षित होत असुन लवकरच एक लाख लिटर पर्यंत दुध संकलन होणार असल्याचे पाटील यांनी पत्रकार परीषदेत सांगीतले.
इंदापूर तालुक्यात प्रत्येक गावात दुध संकलन सेंटर सुरू करण्यासाठी शेतकर्यांना संघाकडून मदत करण्यात येणार असुन सध्या तालुक्यात 14 सेंटरवर दुध संकलीत होत असुन 260 नवीन सेंटर मंजुरीसाठी अर्ज संघाकडे आलेले आहेत. त्यांनाही अर्थीक मदत व परवानगी देण्याचे काम सुरू आहे.तर तालुक्यातील दुध हे दुधगंगा संकलीत करणार असुन त्याची खरेदी अमुल करणार असल्याने हमी भावापेक्षा जादा दर मिळनार असल्याने शेतकर्यांना पुन्हा सुगीचे दीवस येणार आहेत.तर दूधगंगा सध्या संपूर्ण कर्जमुक्त असुन एक रूपयाही कर्ज दुधगंगाकडे नसल्याचे पाटील यांनी सांगीतले. ते म्हणाले तालुक्यात काही ठीकाणी दुध गंगा बाबत अफवा पसरविण्याचे कार्य जोरात सुरू असुन लोकांनी अफवावर विश्वास ठेवु नये असे पाटील यांनी सांगीतले.
हमी भावापेक्षा कमी दर देणार्यांच्या पायाखालची वाळु सरकणार..
इंदापूर तालुक्यातील बरेच दुध संघ हे सध्या शासनाच्या हमी भावापेक्षा पाच ते सहा रूपये कमी दराने दुध खरेदी करून शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात आर्थीक पिळवणूक व फसवणूक करत आहेत. तसेच त्यांनी तयार केलेले हलक्या दर्जाचे पशुखाद्यही नाइलाजाने घेण्यास भाग पाडत आहेत. दूधगंगाने अमुलशी करार केल्याने अमुल शेतकर्यांच्या दुधाला हमी भावापेक्षा जास्त दर देत असल्याने इंदापूर तालुक्यातील इतर दूध संघ चालकांच्या पायाखालची वाळु सरकु लागल्याने अत्ता तेही दुधाला दर वाढवुन देण्याची भाषा करू लागले आहेत.परंतु या अगोदर यांनी दुध दर वाढविण्याची भाषा का केली नाही असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थीत करून दूधउत्पादक शेतकर्यांना पुन्हा चांगले दिवस येतील असे सांगीतले.