इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन, राज्यमंत्री भरणे यांच्यासह नगरसेवकांची अनुउपस्थिती

इंदापूर : प्रतिनिधी (सुधाकर बोराटे) –  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रिय कृृषि व संरक्षण मंत्री शरदचंद्रजी पवार यांचेबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे नवनियुक्त आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरूवार दि.25 रोजी जाहीर निषेध नोंविण्यात आला.यावेळी पडळकर यांचे फोटो प्रतीमेवर काळी शाई टाकुन चप्पलने जोडे मारो आंदोलन राष्ट्रवादीचे पूणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर व शहराध्यक्ष अनिल राऊत यांचे नेतृत्वाखाली इंदापूर पोलीस स्टेशन समोर करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रदीप गारटकर म्हणाले की शरद पवार साहेबांच्या बद्दल बोलताना भाजप आमदार गो. पडळकर यांनी अतिशय खालच्या पातळीवर टीका केली आहे. विरोधक सुद्धा पवार साहेबांवर टीका करताना आदराने बोलतात.परंतु गोपीचंदाची जीभच घसरल्याचे सर्वांनी टीवी चॅनलवर पाहीले आहे पडळकरांचे विचार हे अतिशय हीन असल्याने त्यांचा राष्ट्रवादीच्या वतीने जाहीर निषेध करत असल्याचे सांगीतले.

यावेळी राष्ट्रवादीचे इंदापूर तालुकाध्यक्ष हणुमंत कोकाटे, महीला आघाडी तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर, शहराध्यक्ष अनिल राऊत, स्मीताताई पवार,बाळासाहेब व्यवहारे, माजी नगरसेवक हरिदास हराळे, अविनाश मखरे,तात्यासाहेब वडापूरे,माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे,राजेश शिंदे, वसंतराव आरडे, अरबाज शेख, दादासाहेब सोनवणे, किसनराव जावळे,सुनिल अडसुळ यांचेसह राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते उपस्थीत होते. तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे आदोलन स्थळी उपस्थीत राहु शकले नाहीत. राष्ट्रवादीच्या वतीने इंदापूर पोलीस निरिक्षक नारायण सारंगकर यांना निवेदन देवुन निषेध नोंदविण्यात आला.

* निषेध आंदोलनास राष्ट्रवादी नगरसेवकांची दांडी.

इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशन समोर निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याची माहीती राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अनिल राऊत यांनी प्रसार माध्यमातुन जाहीर केले होते.तर इंदापूर नगरपरीषदेत राष्ट्रवादीचे आठ निवडून आलेले नगरसेवक असुन त्याच्यापैकी एकही नगरसेवक निषेधा आंदोलणासाठी उपस्थीत न राहील्याने इंदापूर शहरात राजकीय पातळीवर उलट- सुलट चर्चेला उधाण आले आहे.

* पडळकराला राष्ट्रवादी महाराष्ट्रात फीरणे मश्कील करेल…मा.तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील.

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी आपली लायकी ओळखुन शरद पवार साहेबांच्या बद्दल बोलावे.आपण कोणाबद्दल बोलतो आहेत याची जरा जाण ठेवावी.महाराष्ट्राचे दैवत असणार्‍या पवार साहेबांच्याबद्दल जे शब्द वापरलेत ते पडळकर व त्यांचा बोलविता धनी यांचा जाहीर निषेध करत असुन बेताल वक्तव्य व प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जीभेवरचा ताबा सोडणार्‍या पडळकराला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महाराष्ट्रात फिरकुही देणार नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसपार्टीचे माजी तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील यांनी पोलीसनामाश बोलताना व्यक्त केले.