इंदापूरात मुख्याधीकारी व नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालुन नोंदविला निषेध

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मागास वर्गीयांसाठी लागु असणार्‍या रमाई घरकुल योजने अंतर्गत २०१५-१६ सालापासुन इंदापूर नगरपरिषदेकडे घरकुलांची मागणी करून देखील आजपर्यंत एकाही लाभार्थ्यास घरकुल मंजूर झालेले नाही. त्याबाबत नगरपरिषदेकडे वारंवार पाठपुरावा करून देखील काहीच उत्तर मिळत नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), बहुजन वंचित आघाडी, भारतीय जनता पार्टी, व काही सामाजिक संघटनांचे पदाधीकारी नगरपरिषद मुख्याधीकारी व नगराध्यक्ष यांची भेट घेण्यासाठी सोमवार दिनांक १६ मार्च रोजी दुपारी पावणेएक वाजताच्या सुमारास नगरपरिषदेत गेले असता नगरपरिषद कार्यालयामध्ये मुख्याधीकारी व नगराध्यक्षा हे दोघेही गैरहजर होते. यामुळे बंद दरवाजावर निवेदन चिकटवुन वारंवार गैरहजर असणारे मुख्याधीकारी डाॅ. प्रदिप ठेंगल व नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या खुर्च्या रिकाम्या असल्याने दोन्ही अधिकार्‍यांच्या खुर्चिला हार घालुन सर्वपक्षीय निषेध नोंदविण्यात आला.

१०१५-१६ पासुन रमाई घरकुल योजनेच्या प्रतिक्षेत असणारे लाभार्थी यांनी नगरपरिषदेकडे वारंवार पाठपुरावा करून देखील नगरपरिषदेचे मुख्याधीकारी व नगराध्यक्षा या राजकीय हेतुने जाणीवपूर्वक दूर्लक्ष करीत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. तर रमाई घरकुल योजनेचा विषय जाणीवपूर्वक बाजुला टाळुन मागास वर्गीय समाजाला लाभापासुन दुर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुख्याधीकारी हे इंदापूर नगरपरिषद कार्यालयात वारंवार अनुपस्थित रहात असल्याने सर्व सामाण्यांच्या कामांचा खोळंबा होत असुन नागरिकांना वारंवार नगरपरिषदेत किरकोळ कामासाठी चकरा माराव्या लागत आहेत. याचा त्रास नागरीकांना सोसावा लागत आहे. तर मुख्याधीकारी मात्र वारंवार नगरपरिषद कार्यालयात दांड्या मारत असल्याने अशा अधीकार्‍यांच्या कार्यालयातील रिकाम्या खुर्च्यांना हार घालुन त्यांचा जाहिर निषेध करत असल्याचे म्हटले आहे. यावेळी भाजपचे दीलीप शिंदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पूणे जिल्हा सचिव शिवाजीराव मखरे, तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे, सुधीर मखरे, बाळासाहेब सरवदे, हनुमंतराव कांबळे, अशोक पोळ, अमोल मिसाळ, महेश सरवदे यांचेसह आनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मागील दोन वर्षापासुनचे सर्व घरकुल प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे पाठविले असुन त्यामध्ये त्रुटी असल्याबाबतचे समाजकल्याणकडून मागील आठवड्यात पत्र आलेले आहे. परंतु ते मी प्रत्यक्षात पाहीलेले नाही. पत्र पाहुन त्या अणूषंगाने पुढील कार्यवाही करणार असल्याचे मुख्याधीकारी डाॅ. प्रदीप ठेंगल यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले.