इंदापूरात राष्ट्रवादी स्विकृत नगरसेवक पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार..?

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर नगरपरिषदेतील राष्ट्रावादी काँग्रेस पार्टीचे स्विकृृत नगरसेवक श्रीधर लक्ष्मण बाब्रस यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दील्याने त्यांच्या जागी रिक्त झालेल्या नगरसेवक पदाच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कोणाची वर्णी लागणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शहरामध्ये सध्या राजकीय पातळीवर तर्क वितर्काला उधाण आले आहे. तर काहीनी आमच्याच गटाचा नगरसेवक होणार या साठी देव पाण्यात बुडविण्याची तयारी सुरू केली असुन इच्छुकांच्या यादीत अनेकजन असल्याने पक्ष कोणाच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ घालणार याबाबत सध्यातरी बोलणे अवघड असुन येत्या २४ मार्च २०२० रोजी याबाबतची स्पष्टता होणार असल्याने सध्या राजकीय चर्चेला चांगलाच उत आला असल्याचे दीसुन येत आहे.

इंदापूर नगरपरिषदेतील राष्ट्रवादीचे स्विकृृत नगरसेवक श्रीधर बाब्रस यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार पदाचा राजीनामा दील्याने एक जागा रिक्त झालेली आहे. तर राष्ट्रवादीकडून इच्छुकामध्ये प्रशांत भाणुदास सिताप व दादासाहेब मारूती सोनवणे यांची नावे जोरदार चर्चेत असल्याने इच्छुकांमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळत आहे.प्रशांत साताप यांचे सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात असुन ते पक्षाचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात.तर नगरपरिषद निवडणुकीमध्ये त्यांना स्विकृृृृत नगरसेवपदी घेण्याचा पक्षाकडून शब्द दील्याची चर्चा असल्याने प्रशांत सिताप यांची दावेदारी भक्कम मानली जात आहे.

दादासाहेब मारूती सोनवणे हे मागासवर्गीय समाजातील धडाडीचे नेते असल्याने त्यांच्या पाठीशी समाजाची मोठी ताकत आहे. शिवाय त्यांचे पक्षातील सर्वच नेते मंडळीशी सलोख्याचे संबध असुन समाज कार्यातही ते अग्रेसर असतात त्यामुळे दादा सोनवणे यांचीही दावेदारी भक्कम मानली जात आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवड समिती कोणता निर्णय योग्य ठरवतात याकडे संपूर्ण इंदापूर तालुक्याचे लक्ष लागुन राहील्याने राष्ट्रवादी स्विकृृत नगरसेवक निवडीची चुरस चांगलीच वाढल्याचे दीसुन येत आहे.

इंदापूर नगरपरिषदेतील काँग्रेस स्विकृत नगरसेवक भरत शहा यांचाही तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असुन काँग्रेसच्या गोटात याबाबत अद्याप शांतताच असल्याचे दीसुन येत आहे. तर काँग्रेस पक्षाकडूनही नगरसेवक पदासाठी आनेकजण गुढग्याला बाशिंग बांधुन तयार असल्याने काँग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठी काय निर्णय होणार याबाबतची स्पष्टता गुलदस्त्यातच आहे.