राजगृहावर हल्ला : इंदापूरात सर्वपक्षीय पक्ष व सामाजीक संघटनाच्या वतीने निषेध

इंदापूर : प्रतिनिधी (सुधाकर बोराटे)  –  मुंबई येथील राजगृहावर हल्ला करणाऱ्यां विकृत धर्मांध शक्तींना शिक्षा झालीचं पाहिजे. राजगृह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान व ज्ञान केंद्रही आहे.जगातील महत्त्वाचे ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी ठेवले होते आणि ही वास्तू म्हणजे देशाची अस्मिता आहे.याच्यावर हल्ला करणे म्हणजे देशातील प्रत्येक नागरीकाच्या अस्मीतेवर हल्ला असल्याने इंदापूर येथे सर्व पक्षीय व विविध सामाजिक संघटनांच्या वतिने जाहीर निषेध नोंदवुन आरोपींना ताकाळ अटक करण्यात यावी या मागणीबाबतचे निवेदन इंदापूर तहसिलदार व वरिष्ठ पोलीस निरिक्षक नारायण सारंगकर यांना देण्यात आले.

यावेळी इंदापूर विचार मंथन परिवार व इंदापूर नागरी संघर्ष समीतीच्या वतीने नगरपरीषद इमारती समोरील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे अर्ध पुतळ्यास पुष्पहार घालुन निषेध घोषणा देवुन घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. तर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट), पिपल्स रिपब्लिकन पार्टी ( जोगेंद्र कवाडे गट) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, समता सैनक दल व इतर सामाजीक संघटनांच्या वतीने संबधीत विभागाला निवेदणे देवुन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी इंदापूर नगरपरीषदेचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, माजी उपनगराध्यक्ष कृृृष्णाजी ताटे,माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, आरपीआयचे शिवाजीराव मखरे, बाळासाहेब सरवदे, राजेश शिंदे,नगरसेवक अनिकेत वाघ, अमर गाडे, दादा सोनवणे,राजश्री मखरे,हेमलता माळुंजकर, उमाताई इंगोले, अविनाश मखरे, अशोक मखरे सर,सुधीर मखरे,संदीपान कडवळे,नितीन आरडे, अशोकराव पोळ, अनिल राऊत,हमिदभाई आतार, हणुमंत कांबळे,माउली नाचन,महेश सरवदे,महादेव लोखंडे, स्मीताताई पवार इत्यादी सर्वपक्षीय राजकिय व सामाजीक संघटना प्रमुख होते.