इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाचा कारभार ‘सलाईन’वर, डाॅक्टरच खेळताहेत रूग्णांच्या जिवाशी

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर उपजिल्हा रूग्णालयामध्ये दिवसा व रात्री-अपरात्री दाखल होणारे अत्यवस्थ व गंभीर रूग्णांना तात्काळ उपचार सेवा मिळावी यासाठी इंदापूर परिसरातील खासगी तज्ञ व स्पेशालिस्ट डाॅक्टरांच्या नेमणूका उपजिल्हा रूग्णालयात केल्या आहेत. परंतु या महाशयांनी स्वत:चे खासगी दवाखाने ठाकलेले असल्याने त्यांना इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयात सेवा देताना कधी कुणी पाहिल्याचे व रूग्णालयात सेवा दिल्याचे ऐकिवात नाही. केवळ शासकीय मानधन लाटण्यासाठी खटाटोप असल्याची चर्चा असुन यातील एकही डाॅक्टर उपजिल्हा रूग्णालयात फिरकत नसल्याने रुग्णांच्या जिवाचे हाल होत आहेत. अनेकदा तर उपचाराअभावी रूग्ण दगावलेले आहेत. वैद्यकीय अधिक्षक राजेश मोरे हे पुणे मुक्कामी राहुन इंदापूरचा गाडा हाकत आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिक्षक राजेश मोरे यांचेकडून उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रकार होत असल्याने, मोरे यांच्या मनमानी कारभारास तालुक्यातील नागरीक कंटाळले असुन उपजिल्हा रूग्णालयाचा कारभार सलाईनवर असल्याचे बोलले जात आहे.

रूग्णालयात येणारे अत्यवस्थ व गंभीर जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात तज्ञ डाॅक्टरांच्या ऐवजी रूग्णालयातील परिचारीका व साफसफाई कर्मचारी यांचे माध्यमातून उपचार केले जात असल्याने रूग्णालयातील रूग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असुन उपचार व्यवस्थित न मिळाल्यामुळे अनेक रूग्ण दगावलेले आहेत. तर रूग्णालयात डाॅक्टरांकडून योग्य उपचार व सुविधा मिळत नसल्याने रूग्णांचे व त्यांचेबरोबर येणारे नातेवाईक यांनाही येथील समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिचारिका व सफाई कर्मचारी यांचेकडून रूग्णांवर उपचार करवुन घेणे हा प्रकार गंभीर असुन यामागे सर्वस्वी उपजिल्हा रूग्णांलयाचे वैद्यकीय अधिक्षक राजेश मोरे यांचा मनमानी व बेजबाबदारपणाचा कारभारच असल्याचे बोलले जात आहे.

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना सेवा मिळत नाहीत अशा शेकडो तक्रारी पुणे-मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाकडे गेल्यामुळे चक्क तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांना यासंदर्भात मागील काही दिवसांपुर्वी तातडीची आढावा बैठक घ्यावी लागली होती. यावेळी रूग्णालयातील गैरकारभार सुधारण्याच्या सुचना रूग्णालयात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. परंतु निर्ढावलेले वैद्यकीय अधिक्षक यांनी आमदार भरणे यांच्या आदेशाला बासनात गुंडाळुन जैसे थे स्थितीच कायम ठेवली. त्यामेळे राजेश मोरे यांची इंदापूर येथील कार्यसेवा ही संदीग्धता निर्माण करणारी वाटत असुन पुणे जिल्हा शल्यचिकित्सक अशोक नांदापुरकर व आरोग्य उपसंचालक संजय देशमुख यांनी देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कडक सुचना केल्या आहेत. आमदार दत्तात्रय भरणे यांनी काशीला जाण्यापेक्षा रुग्णांची सेवा करावी असे ज्ञानाचे डोस पाजले परंतु याचा काहीही फरक पडलेला दिसत नाहीये. या प्रकाराला सर्वस्वी वैद्यकीय अधिक्षक राजेश मोरे यांचा मनमानी व लहरी कारभारच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?